RCB vs CSK : टीम डेव्हीड-रजत पाटीदारचा तडाखा, चेन्नई विरुद्ध 250 धावा, आरसीबीचे 4 मोठे रेकॉर्ड्स
GH News April 06, 2026 01:10 AM

आरसीबीने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील एकूण अकराव्या आणि आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात धमाका केला. आरसीबीने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये इतिहास घडवला. आरसीबीच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. आरसीबीच्या पहिल्या 5 फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. तर अखेरच्या क्षणी कॅप्टन रजत पाटीदार आणि ऑलराउंडर टीम डेव्हीड या दोघांनी धावांचा पाऊस पाडला. दोघांनी दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 3 विके्टस गमावून 250 धावा केल्या. आरसीबीने यासह चेन्नई विरुद्ध 4 मोठे विक्रम आपल्या नावावर केले. आरसीबीने काय काय केलं? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

विराट कोहली आणि फिलीप सॉल्ट या दोघांनी आरसीबीला आश्वासक सुरुवात मिळवून दिली. दोघांनी 37 धावांची सलामी भागीदारी केली. आरसीबीने विराट कोहली याच्या रुपात पहिली विकेट गमावली. विराटने 18 बॉलमध्ये 28 रन्स केल्या. त्यानंतर फिलीप आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 56 धावा जोडल्या. चेन्नईने आरसीबीला फिलीपच्या रुपात दुसरा झटका दिला. फिलीपने 30 बॉलमध्ये 46 रन्स केल्या.

आरसीबीचा तडाखा

आरसीबीच्या फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठीही अर्धशतकी भागीदारी केली. रजत पाटीदार आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 21 बॉलमध्ये 58 रन्स जोडल्या. आरसीबीने देवदत्त पडीक्कल याच्या रुपात तिसरी विकेट गमावली. देवदत्तने 29 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 5 फोरसह 50 रन्स केल्या.

रजत-टीम डेव्हीडचा तडाखा

त्यानंतर रजत आणि डेव्हीड या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांना बॅटने चोपला. यात डेव्हीडने सर्वाधिक योगदान दिलं. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये नॉट आऊट 99 रन्सची पार्टनरशीप केली. रजतने 19 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 1 फोरसह 48 रन्स केल्या. तर टीमने 25 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद आणि सर्वाधिक 70 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे 250 धावांपर्यंत मजल मारली.

चेन्नईचे आरसीबी विरूद्धच्या सामन्यातील विक्रम

  1. आरसीबी चेन्नई विरुद्ध एका सामन्यात 250 तसेच सर्वाधिक धावा करणारी पहिली टीम ठरली.
  2. आरसीबीची आयपीएल स्पर्धेत 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही 36 वी वेळ ठरली. आरसीबीने यासह चेन्नईच्या विक्रमाची बरोबरी केली.
  3. आरसीबीची हा आयपीएल कारकीर्दीतील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.
  4. आरसीबी चेन्नई विरुद्ध एका सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणारी टीम ठरली. आरसीबीने षटकारांच्या मदतीने 114 धावा केल्या. आरसीबीने 19 षटकार लगावले.
  5. तसेच आरसीबी आयपीएल स्पर्धेत शेवटच्या 5 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारी दुसरी टीम ठरली. आरसीबीने शेवटच्या 30 चेंडूत 97 धावा केल्या.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.