RCB vs CSK Marathi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील ११ वा सामना खेळला जात आहे. हा सामना बंगळुरूच्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) सामन्याच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला असता, पण तो आऊट होता होता वाचला. त्यामुळे अनुष्का शर्माने (Anushka Sharma) दिलेली रिऍक्शन व्हायरल होत आहे.
IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'झाले असे की चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी डावाची सुरुवात केली. पण त्यांना पहिल्या दोन षटकात मोठा शॉट खेळताना आला नव्हता.
यानंतर तिसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर विराटने मोठा शॉट खेळला, त्यावेळी चेंडू मिडऑनला गेला होता. हा झेल घेण्यासाठी शिवम दुबे (Shivam Dube) धावत आला, पण त्याच्या हातून अगदी सोपा झेल सुटला. यावेळी स्टेडियममध्ये जल्लोष झाला.
त्याचवेळी कॅमेरा विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माकडे वळाला. चेंडू ज्यावेळी दुबेच्या हातून सुटला, त्यावेळी अनुष्का आधी मोठा शॉट मारला म्हणून खूश होती, पण जसं तिला कळालं की झेल सुटला, तेव्हा ती चकीत झाल्याची दिसली. तिने दोन्ही हात तोंडावर ठेवले होते. या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, विराटला हे जीवनदान मिळाल्यानंतरही फारशी मोठी खेळी करता आली नाही. तो ५ व्या षटकात अंशुल कंबोजविरुद्ध खेळताना शिवम दुबेच्याच हातून झेलबाद झाला. त्याने १८ चेंडूत २८ धावा केल्या. पण तो बाद झाल्यानंतरही बंगळुरूकडून फलंदाजीला आलेल्या प्रत्येक फलंदाजाने फटकेबाजी केली.
फिल सॉल्टने ३० चेंडूत ४६ धावांची खेळी केली. त्याने ३ चौकार आणि २ चौकार मारले. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने २९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. रजत पाटिदारने १९ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. टीम डेव्हिडने २५ चेंडूत ३ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ७० धावांची खेळी केली. त्यामुळे बंगळुरूने २० षटकात ३ बाद २५० धावा केल्या.
IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पारचेन्नईकडून गोलंदाजी करताना अंशुल कंबोज, जेमी ओव्हर्टन आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. चेन्नईसमोर आता २५१ धावांचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य जर चेन्नईने गाठलं तर ते इतिहास घडवतील.