Raigad Accident : अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक मधील किन्नर जागीच ठार झाला आहे. अलिबाग वडखळ मार्गावरील धरमतर खाडीजवळ आयशर टेम्पोनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात संदेश कृष्णा तेलगे (वय 35, रा. फणसापूर, ता. अलिबाग) याचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रेलर चालक शिवपूजन बिसेश्वर पासवान राहणार नेरळ रायगड याच्यावर वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 वर्षीय अरिझ शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. क्लाउड 9, आनंदवन परिसरात ही घटना घडली आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टँकरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर संबंधित चालकाला ताब्यात घेऊन कालेपाडळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
पुण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. बास्केटबॉलच्या रिंगला पुश-अप मारताना लोखंडी रिंग कोसळून बी. टेकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना तळेगावातील इंदुरी परिसरात घडली आहे. विपुल वर्मा असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील अयोध्येचा रहिवासी होता.
दरम्यान, या घटनेनंतर महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नेमकी चूक कुणाची याचा तपास सध्या सुरू आहे.
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जैतपिर गावात पिकअप व्हॅन उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 11 जण जखमी झाले आहेत. समोरुन ट्रक आल्याने पिकअप व्हॅन वरील चालकाचे नियंत्रण सुटले अन् अचानक व्हॅन उलटून सर्व प्रवाशी खाली कोसळले. चार चाकी वाहन उलटल्यानंतर त्यातील प्रवासी रस्त्यावर पडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
वाहनाच्या मागच्या बाजूस बसलेले आठ ते दहा हजार वाहन उलटल्यानंतर रस्त्यावर पडल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत. पाच जणांना किरकोळ दुखापत झाली असून गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना धुळ्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.