रिलायन्स जिओने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी 339 रूपयांच्या किमतीचा एक नवीन परवडणारा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे याची वैधता 28 दिवसांची नसून पूर्ण एका महिन्याची आहे. कंपनीने हा प्लॅन लोकप्रिय 349 च्या प्लॅनला एक स्वस्त पर्याय म्हणून सादर केला आहे. डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंगसोबतच यात अनेक डिजिटल फायदेही मिळतात. ज्या वापरकर्त्यांना कमी किमतीत अधिक फायदे हवे आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन विशेषतः योग्य आहे. चला तर मग या प्लॅनच्या इतर अनेक फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.
339 रुपयांच्या प्लॅनमध्ये नवीन कोणते फायदे आहेत?रिलायन्स जिओचा हा नवीन प्लॅन वापरकर्त्यांना दररोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस देतो. यात 14.95 रूपयांचा टॉकटाईम बॅलन्सही मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64 केबीपीएस पर्यंत कमी होतो. या प्लॅनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची महिन्याची वैधता म्हणजेच महिना 30 असो वा 31दिवसांचा संपूर्ण महिनाभर चालतो. यामुळे वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका मिळते आणि त्यांना महिन्यातून एकदाच रिचार्ज करता येईल.
349 रुपयांच्या प्लॅनपेक्षा किती वेगळेरिलायन्स जिओचा 349 रूपयांचा प्लॅन आधीच खूप लोकप्रिय आहे, जो 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी डेटा देतो. जो नवीन 339 रूपयांचा प्लॅन हा एक स्वस्त पर्याय आहे आणि त्यात जवळपास तेच फायदे मिळतात. मात्र सर्वात मोठा फरक वैधतेमध्ये आहे, जिथे 339 रूपयांचा प्लॅन पूर्ण महिनाभर चालतो. मात्र यामध्ये 349 रूपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला अनलिमिटेड 5जी डेटाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे, जे वापरकर्ते वारंवार इंटरनेट वापरतात त्यांच्यासाठी 349 रूपयांचा प्लॅन अधिक चांगला ठरू शकतो, तर सामान्य वापरकर्त्यांसाठी 339 रूपयांचा प्लॅन अधिक फायदेशीर ठरू शकतो.
मोफत सब्सक्रिप्शन आणि अतिरिक्त फायदेया प्लॅनद्वारे जिओ केवळ टेलिकॉम सेवाच नव्हे, तर डिजिटल लाभही देते. यामध्ये जिओ टीव्ही (JioTV) आणि जिओ एआय क्लाउड (JioAICloud) चा ॲक्सेस मिळतो. याव्यतिरिक्त यात गुगल जेमिनी प्रो (Google Gemini Pro) चे 18 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जाते, जे खूप मौल्यवान मानले जाते. तसेच, वापरकर्त्यांना 5000 जीबी (५ टीबी) पर्यंतच्या क्लाउड स्टोरेजचा लाभही मिळतो. मात्र या सर्व लाभांचा फायदा घेण्यासाठी, वापरकर्त्यांना आपला प्लॅन सक्रिय ठेवावा लागेल.