Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
Tv9 Marathi April 06, 2026 01:45 AM

अनेकांसोबत असं घडतं की ते कधीही एका ठिकाणी काम करू शकत नाही. त्यांच्या नोकरीमध्ये स्थिरता नसते, ते सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. कधीकधी तर ते जिथे काम करत आहेत, तिथे त्यांचं सर्व सुरळीत सुरू असतं. मात्र तरी देखील ते नव्या नोकरीच्या संधी शोधतात, असे लोक आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्या नोकऱ्या बदलतात. काही लोक तर आपलं कार्यक्षेत्रच बदलतात. अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीही स्थिरता लाभत नाही. परंतु असं का होतं? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असतो, अशा लोकांसोबत हे घडू शकतं. कारण चंद्राला स्थिरतेचा कारक ग्रह असं म्हटलं आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असतो, अशा लोकांचं आयुष्य हे अस्थिर असतं. तसेच ते आपल्या आयुष्यात कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत.

चंद्र कमजोर असल्यास काय होतं?

जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमजोर असेल तर अशावेळी तुमच्या आयुष्यात एक प्रकारची अस्थिरता येते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये देखील निर्णय घेण्यास तुम्हाला अडचणी निर्माण होतात. नोकरीमध्ये देखील कायम अस्थिरता जाणवते, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमजोर असेल तर असा व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेकदा नोकरी बदलतो, त्याचा परिणाम हा त्याच्या आर्थिक स्थितीवर होतो. त्यामुळे आज आपण कुंडलीमधील चंद्रग्रह मजबूत करण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

जर तुम्हालाही अशी अस्थिरता जाणवत असेल, तुमचं तुमच्या कामात लक्ष लागत नसेल. मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतील तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला आहे. दररोज रात्री झोपताना एक चांदीचा ग्लासभरून पाणी घ्या, रात्री झोपताना ते तुमच्या शेजारी झाकून ठेवा, आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर ते पाणी प्राशन करा, जर तुमच्याकडे चांदीचा ग्लास नसेल तर तुम्ही आपल्या साध्या पेल्यात देखील पाणी घेऊ शकता, फक्त त्यामध्ये एखादं चांदीचं नाण टाका. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या. असा प्रयोग काही दिवस केल्यास तुमच्या कुंडलीमधील चंद्र ग्रह मजबूत होतो. कारण चांदीमुळे चंद्र मजबूत होतो, असं मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.