GAURAV MORE MARRIAGE:आपल्या विनोदी शैलीने आणि 'फिल्टर पाड्याचा रॉकस्टार' म्हणून अवघ्या महाराष्ट्राला हसवणारा अभिनेता गौरव मोरे अखेर विवाहबंधनात अडकला आहे. गौरवने त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली असून त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून लाडक्या अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on InstagramA post shared by Priyanka karekar (@karekarpriyanka)
गौरव मोरे याने प्रियांका कारेकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे गौरवने अद्याप त्याच्या लग्नाबद्दल अधिकृतरीत्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र, गौरवची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सोशल मीडियावर गौरव आणि प्रियांकाच्या लग्नाचा फोटो शेअर करत या आनंदाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. ऋतुजाने शेअर केलेल्या या फोटोमुळेच गौरवच्या लग्नाची बातमी समोर आली आणि चाहत्यांना सुखद धक्का बसला. शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
View this post on InstagramA post shared by मराठी Box Office (@marathiboxoffice)
गौरव आणि प्रियांकाचा हा विवाहसोहळा अत्यंत घरगुती आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडल्याचे समजते. फोटोमध्ये गौरव आणि प्रियांका पारंपरिक वेशात अतिशय सुंदर दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जातोय. गौरवची पत्नी प्रियांकादेखील एक अभिनेत्री आहे. गौरव आणि ती खूप जुने मित्र आहेत. त्यांनी आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. एका साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन आपल्या जिद्दीच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावणाऱ्या गौरवच्या या नवीन प्रवासासाठी त्याचे चाहते आणि सिनेसृष्टीतील कलाकार भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
मधुरा वेलणकरच नाही, तिची सख्खी बहीणही आहे लोकप्रिय अभिनेत्री; झी मराठीच्या 'शिवा' मालिकेत केलेलं काम, तुम्ही ओळखलंत?