RCB vs CSK Marathi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL) स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) सलग दुसरा विजय मिळवला आहे. रविवारी घरच्या मैदानाच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला ४३ धावांनी पराभूत केलं.
चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. बंगळुरूच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी केली होती, त्यानंतर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी करत चेन्नईच्या नियमित अंतराने विकेट्स घेतल्या.
या सामन्यात बंगळुरूने चेन्नईसमोर २५१ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला १९.४ षटकात ९ बाद २०७ धावाच करता आल्या.
IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभवचेन्नईकडून सलामीला खेळताना कर्णधार ऋतुराज गायकवाडने षटकारासह चांगली सुरुवात केली होती. पण त्याला त्यानंतर जेकॉब डफीने ६ धावांवर बाद केले. त्यानंतर लगेचच पुढच्या षटकात भूवनेश्वर कुमारने आयुष म्हात्रेला १ धावेवरच माघारी धाडले. डफीने तिसऱ्या षटकात पुन्हा एक मोठा धक्का चेन्नईला दिला.
त्याने संजू सॅमसनला ९ धावांवर बाद केले. पण तरी दुसऱ्या बाजूने सर्फराज खानने आक्रमक फलंदाजी केली. त्याला दुसऱ्या बाजूने कार्तिक शर्मा साथ देत होता. सर्फराजने अर्धशतकही केले. पण त्यानंतर ७ व्या षटकात सर्फराजला कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर जितेश शर्माने यष्टीचीत केले. याच षटकात कार्तिक शर्मालाही कृणाल पांड्याने ६ धावांवर बाद केले. सर्फराजने २५ चेंडूत ५० धावांची खेळी केली.
नंतर शिवम दुबे आणि प्रशांत वीर यांनी डाव पुढे नेला. पण दुबेला १८ धावांवरच अभिनंदन सिंगने बाद केले. त्यामुळे चेन्नईने १० व्या षटकातच १०८ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर प्रशांत वीर आणि जेमी ओव्हर्टन यांनी फटकेबाजी करत आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण १६ व्या षटकात भुवनेश्वर कुमारने प्रशांत वीरला बाद केले. त्याचा अफलातून झेल रजत पाटिदारने घेतला. प्रशांतने २९ चेंडूत ४३ धावांची खेळी केली.
पुढच्या षटकात जेमी ओव्हर्टनही १६ चेंडूत ३७ धावांवर सुयश शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. नूर अहमदला भुवनेश्वर कुमारने ८ धावांवर आणि मॅट हेन्रीला २ धावांवर अभिनंदनने बाद करत चेन्नईचा डाव संपवला. अंशुल कंबोज १२ चेंडू १९ धावांवर नाबाद राहिला.
बंगळुरूकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. जेकॉब डफी, अभिनंदन सिंग आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सुयश शर्माने १ विकेट घेतली.
IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पारतत्पुर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले होते. पण बंगळुरूने २० षटकात ३ बाद २५० धावा केल्या. बंगळुरूकडून टीम डेव्हिडने २५ चेंडूत ३ चौकार आणि ८ षटकारांसह ७० धावांची नाबाद खेळी केली. देवदत्त पडिक्कलने २९ चेंडूत ५० धावांची खेळी केली. रजत पाटिदारने १९ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. फिल सॉल्टने ३० चेंडूत ४६ धावा केल्या. विराट कोहलीने १८ चेंडूत २८ धावा केल्या.
चेन्नईकडून अंशुल कंबोज, शिवम दुबे आणि जेमी ओव्हर्टन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.