IPL Points Table: CSK वरील दणदणीत विजयाने RCB अव्वल क्रमांकावर; लखनौनेही उघडलंय पाँइंट्सचं खातं, पाहा कोण कोणत्या स्थानी
esakal April 06, 2026 04:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL) स्पर्धेत रविवारी डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) होता. पहिल्या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला. हा लखनौचा पहिला विजय ठरला. त्यामुळे त्यांनी २ गुणांसह त्यांचं खातं उघडलं आहे. हैदारबादला मात्र तीन सामन्यांतील दुसऱ्या पराभवाचा सामना केला.

IPL 2026: RCB ने घरंच मैदान मारलं! बंगळुरूच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांही चमकले; CSK चा सलग तिसरा पराभव

दरम्यान, रविवारी दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४३ धावांनी विजय मिळवला. गतविजेत्या बंगळुरूचा हा सलग दुसरा मोठा विजय आहे. मात्र चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या दोन सामन्यानंतर आयपीएलच्या पाँइंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत.

बंगळुरूने पहिल्या सामन्यात हैदराबादला ६ विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यानंतर आता चेन्नईला ४३ धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे बंगळुरूने पाँइंट्स टेबलमध्ये थेट अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यांचे आता २.५०१ नेट रन रेटसह ४ गुण आहेत. त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स हे तीन संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या संघांचेही प्रत्येकी ४ गुण आहेत. पण नेट रन रेटमुळे त्यांचा क्रम ठरला आहे.

IPL 2026 Points Table (5th April 2026)

सनरायझर्स हैदराबादला दुसरा पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांनी विजयाच्या अत्यंत जवळ येऊन पराभव स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. त्यांचे २ गुण असून ते ५ व्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी २ सामन्यांतील एका विजयासह अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांचेही २ गुण आहेत.

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे तीनच असे संघ आहेत, ज्यांनी अद्याप एकही विजय मिळवलेला नाही. गुजरात आणि कोलकाता यांना दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. हे दोन्ही संघ अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. चेन्नई सुपर किंग्स सलग तीन पराभवांमुळे सर्वात शेवटच्या स्थानी आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.