सनी लिओनी आता हॉलिवूड गाजवणार! या सिरीजमध्ये साकारतेय भूमिका
esakal April 06, 2026 04:45 AM

Entertainment News : अभिनेत्री सनी लिओनी आता जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. 'केनेडी' चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाल्यानंतर, सनी आता एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात झळकणार आहे. अमेरिकेतील आगामी 'द जायंट' या सीरिजमध्ये सनी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, तिच्या या नवीन वाटचालीमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या सीरिजमध्ये सनी लिओनी क्वाना डीरलीफ नावाच्या एका रिझर्व्हेशन शेरिफची भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत ग्लॅमरस भूमिकांमध्ये दिसलेली सनी पहिल्यांदाच एका अमेरिकन सीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या कडक अवतारात दिसणार आहे. केविन बी. प्लॉट यांनी या सीरिजचे लेखन आणि निर्मिती केली असून, आर्टिमिस थिएट्रिकल प्रॉडक्शन्स या संस्थेमार्फत याची निर्मिती केली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)