नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा धमाका अजूनही कित्येकांच्या मनात ताजा आहे, त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. मात्र आता राजधानी दिल्लीला पुन्हा टार्गेट करण्यात येणार होतं अशी माहिती समोर आली आहे. टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील कुर्ला येथून 18 वर्षांच्या हमास सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत हमास याला बेड्या ठोकल्या.
दिल्ली स्पेशल सेलकडून हमास सिद्दीकीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान टीव्ही9 मराठीने, अटक करण्यात आलेला हमसा सिद्दीकी याच्या वडिलांशी जलालुद्दीन सिद्दक्की यांच्यांशी संवाद साधला. 3 तारखेला काही अधिकाऱ्यांनी घरात येऊन हमासला अटक केली आणि ते घेऊन गेले. त्या दिवशी नेमकं काय घडलं, अधिकाऱ्यांनी हमासला अटक करून घेऊन जाताना काय सांगितलं, हे जलालुद्दीन यांनी सविस्तरपण सांगितलं.
पहाटे 4.30 -5 च्या सुमारास 18-20 लोकं इथे, आमच्या घरी आलो होते, त्यांनी माझ्या मुलाला उचललं आणि घेऊन गेले. माझा मुलगा नुकताच 18 वर्षांचा झालाय, तो एक विद्यार्थी आहे, एखादा गुन्हेगार नव्हे, तो चांगला, अभ्यासू मुलगा आहे. 10 वीत त्याला 76 टक्के मिळाले होते, असं हमासच्या वडिलांनी जलालुद्दीन यांनी सांगितलं.
मात्र गेल्या 2-3 महिन्यांतच त्याचं गेम खेळताना कोणाशी तरी कनेक्शन झालं, कारण संपूर्ण जगभरात पबजी वगैरे सारखे गेम खेळतात ना, त्यातूनच कनेक्शन झालं, असं समोरच्यांनी (अधिकारी) सांगितलं, असं ते म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे.