ना उम्र की सीमा हो… दोन मुलांच्या आईचं 20 वर्षांनी लहान तरूणाशी लग्न, नवरदेवाची अनोखी ऑफर
Tv9 Marathi April 06, 2026 04:45 PM

UP shocking marriage news: एका दोन मुलांच्या आईने अवघ्या 2 वर्षांनी लहान मुलासोबत विवाह केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण इथेच थांबत नसून लगेच या नवरदेवाने त्या महिलेच्या 16 आणि 13 वर्षांच्या मुलींना स्वीकारण्याची ऑफर देखील दिली. पुढे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.  या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असून, या विचित्र लग्नामागचे नक्की कारण काय? हे आता समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशातील संभल येथील एका घटनेत दोन मुलांची आई तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या एका मुलासोबत प्रेमसंबंधात अडकली. या अनपेक्षित घटनेने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. चला जाणून घेऊया हे अनोखं प्रकरण..

ना उम्र की सीमा हो…

प्रेमाला कोणतीही सीमा नसते आणि वय ही केवळ एक संख्या आहे. दोन मुलांची आई एका तरुण मुलाच्या प्रेमात पडली आहे, अशी एक चित्तवेधक कथा संभलमधून समोर आली आहे की तुमचा विश्वास बसणार नाही. त्याच्याबद्दल भावना निर्माण झाल्यानंतर, त्या स्त्रीने आश्चर्यकारकरित्या एक निर्णय घेत वेगळ्याच विश्वात  प्रवेश केला. ही स्टोरी लग्नापासून सुरू होते आणि पुढे महिलेच्या कुटुंबाची डोकेदुखी बनली.

ही घटना संभलमध्ये घडली, जिथे एका महिलेने 20 वर्षांहून लहान मुलाच्या प्रेमात पडल्यानंतर एक धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या दोन मुलींना सोबत घेतलं आणि मुरादाबादमधील छाजलेट येथे प्रवास केला, जिथे तिने या लहान तरूणाशी लग्न केलं. जेव्हा तिच्या पतीने तिचा शोध घेतला तेव्हा त्याला जे समजलं, त्याने तो हादरलाच. आपल्या पत्नीने दुसऱ्या तरूणाशी लग्न केल्याचं त्याला कळलं, तिच्या केसांतील सिंदूरने एका क्षणात सगळं स्पष्ट केलं.

नवरा-सासूला धक्का

तिच्या पतीने आणि सासूने तिला परत येण्यास विनवण्या केल्या, प्रयत्न केले, परंतु तिने ठामपणे नकार दिला. विशेष म्हणजे, या महिलेला 16 वर्षांची आणि 13 वर्षांची मुलगी आहे, ज्यांना तिने छाजलेटमध्ये आणले होते. लग्नानंतर, तरुणाने तिला घरी नेण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिच्या मुलींना स्वीकारण्याची ऑफरही दिली. या ऑफरनंतर पोलिस, तिची सासू आणि तिचा पहिला नवरा डोक्याला हात लावून बसले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यात संध्याकाळपासून रात्रीपर्यंत वाद सुरू होता. अखेरीस, महिलेचे कुटुंबीय संभलहून आले, परंतु तिने परत न येण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या प्रकरण चिघळत गेले. तिने आपल्या प्रियकराबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, तर तिचा नवरा आणि सासू थकूनभागून घरी परतले. दरम्यान, स्थानिक लोक या अशा लग्नाबद्दल अवाकच झाले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.