मात्र, गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाबद्दलच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता या सर्व चर्चांवर गौतमी पाटीलने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
गौतमी पाटीलने नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी तिला तिच्या लग्नाबद्दल, जोडीदाराबद्दल विचारण्यात आले. त्यावर प्रश्नावर उत्तर देताना गौतमी म्हणाली की, माझ्या आयुष्यात तशी कोणतीही व्यक्ती नाही. मी जेव्हा लग्न करेन तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेन. आता फक्त आणि फक्त माझं करिअरकडे लक्ष आहे.
इतके वर्ष उलटल्यानंतरही प्रेक्षकांचे प्रेम कमी झालेले नाही. त्यामुळे हे फार चांगलं वाटतंय. मी अजून सिंगल आहे. मला अजून तरी मनासारखा जोडीदार भेटलेला नाही. तो भेटला की मी सांगते, असेही गौतमी म्हणाली.
दरम्यान गौतमीने लावणी आणि नृत्यातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. अल्पावधीतच ती संपूर्ण महाराष्ट्रात घराघरांत पोहोचली. ‘घुंगरू’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्यासोबत तिने अल्बम साँगमध्यही काम केले आहे.
गौतमीचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहे. तिचे कोणतेही प्रत्येक गाणे प्रदर्शित होताच लगेच ट्रेंडिंगमध्ये येते. गौतमीच्या या स्पष्टीकरणामुळे तिच्या लग्नाबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
गौतमीचे तिचे चाहते आता तिच्या आगामी चित्रपट आणि गाण्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. (सर्व फोटो – गौतमी पाटील/ इन्स्टाग्राम)