तुमचा विजय निश्चित, अशोक खरातने चिंचोक्यावर मंत्र लिहून दिला; निवडणुकीत उमेदवारांचं काय झालं?, विजयी की पराभूत?, धक्कादायक माहिती
मुकेश चव्हाण April 06, 2026 05:43 PM

अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झालाआहे. अशोक खरात यासह समता पतसंस्थेच्या राहाता शाखेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला. 2021 साली समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत उघडली 100 खाती उघडून या खात्यातून आतापर्यंत 60 कोटीपेक्षा अधीक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डी पोलीसांकडून 19 खातेदारांची चौकशी सुरू असताना हा घोटाळा समोर आला आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणाच्या तपासात खरातच्या अनेक मालमत्ता आणि बँक खात्यांबाबत माहिती उघड झाली. अनेकांना जाळ्यात फसवून भोंदू खरातने अमाप माया जमवल्याचं तपासात समोर आलं आहे. याचवरुन भोंदू खरात आता ईडीच्याही निशाण्यावर येण्याची शक्यता आहे.. अशोक खरात प्रकरणाचा आता ईडी तपास करणार असून यामध्ये सहभागी असलेल्या कुणालाही सोडणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. (Ashok Kharat Case Nashik)

संबंधित बातमी:

Anjali Damania On Ashok Kharat Case: रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले, मंत्र्यांचीही नावं घेतली!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.