आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 एप्रिल 2026
esakal April 07, 2026 10:45 AM

पंचांग -

मंगळवार : चैत्र कृष्ण ५, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.२५ सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय रात्री ११.३१ चंद्रास्त सकाळी ९.४१, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००१ - ‘मार्स ओडिसी’ हे अवकाशयान फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल अवकाशस्थानकावरून मंगळाकडे झेपावले.

  • २००५ - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते श्रीनगर-मुजफ्फराबाद बससेवेला प्रारंभ.

  • २००९ - भारताने ४१ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली.

  • २०१३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.