पाफोस (सायप्रस): भारताचा उदयोन्मुख खेळाडू आर. प्रज्ञानंद याला आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागातील पहिल्या सात फेरीनंतर फक्त ३.५ गुणांचीच कमाई करता आलेली आहे. या स्पर्धेचा अर्धा टप्पा पूर्ण झाला असून, आता या स्पर्धेमध्ये बाजी मारण्यासाठी आर. प्रज्ञानंदला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. या स्पर्धेमध्ये १४ फेऱ्यांमध्ये खेळाडूंचा कस लागणार आहे.
आव्हानवीरांच्या स्पर्धेतील विजेत्याला विश्वविजेत्या डी. गुकेशचा सामना करावा लागणार आहे. आर. प्रज्ञानंदला मागील काही महिन्यांत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. महान खेळाडू विश्वनाथन आनंद यांनीही याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले होते. आर. प्रज्ञानंद याला अद्यापही या स्पर्धेमध्ये सूर गवसलेला नाही. आर. प्रज्ञानंदला पहिल्या सात फेरींमधून फक्त एकाच फेरीमध्ये विजय मिळवता आलेला आहे. आता उद्या (ता. ७) होत असलेल्या आठव्या फेरीमध्ये त्याला अनिश गिरीचा सामना करावयाचा आहे. आर. प्रज्ञानंदला जेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी विजय मिळवावाच लागणार आहे.
IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला? मुझीचूकची भरारीयुक्रेनच्या ॲना मुझीचूक हिने मात्र महिला विभागात मोठी भरारी घेतली आहे. कोनेरु हंपी हिने सुरक्षेच्या कारणामुळे या स्पर्धेमधून माघार घेतल्यानंतर ॲना मुझीचूक हिचा या स्पर्धेमध्ये प्रवेश करण्यात आला होता. तिने पहिल्या सात फेऱ्यांनंतर दोन विजयांनंतर ४.५ गुणांची कमाई करीत पहिल्या स्थानावर मुसंडी मारली आहे.
वैशाली दुसऱ्या स्थानीभारताच्या आर. वैशाली हिने महिला विभागात मात्र छान कामगिरी केली आहे. पहिल्या सात फेऱ्यांनंतर तिने चार गुणांची कमाई केलेली आहे. सध्या ती दुसऱ्या स्थानावर आहे. विश्वविजेती दिव्या देशमुख हिला मात्र म्हणावी तशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. दिव्या देशमुख हिलाही फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आलेला आहे. तिला ३.५ गुणांची कमाई करता आलेली आहे. या स्पर्धेत विजेता होण्यासाठी तिला झोकात पुनरागमन करावे लागणार आहे.
काँग्रेसच्या डाऊनफॉलचं विधान, परिपक्वतेवरून आजोबा पवारांनी पार्थचे टोचले कान; काँग्रेसनं म्हटलं, कृतघ्न मुलगा खुल्या गटातील क्रमवारी(पहिल्या सात फेरीनंतर)
१) जावोखिर सिंदारोव - ६ गुण
२) फॅबियानो कारुआना - ४.५ गुण
३) अनिश गिरी - ३.५ गुण
४) आर. प्रज्ञानंद - ३.५ गुण
५) वेई यी - ३ गुण
६) मथाईस ब्लूबॉम - ३ गुण
७) हिकारु नाकामुरा - २.५ गुण
८) आंद्रेय इसिपेन्को - २ गुण
महिला गटातील क्रमवारी(पहिल्या सात फेरीनंतर)
१) ॲना मुझीचूक - ४.५ गुण
२) आर. वैशाली - ४ गुण
३) झू जिनर - ३.५ गुण
४) ॲलेक्झँड्रा गोरीचकिना - ३.५ गुण
५) केटरिना लॅगनो - ३.५ गुण
६) दिव्या देशमुख - ३.५ गुण
७) बिबिसारा असाबायोवा - ३ गुण
८) टॅन झोंगयी - २.५ गुण