इराण बेचिराख करण्याआधी भारतातील…. डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या बैठकीचं गूढ वाढलं; युद्धात पुढं काय होणार?
GH News April 07, 2026 08:12 PM

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आज (7 एप्रिल) रात्रीच्या आठ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. इराणने युद्ध थांबवण्याच्या प्रस्तावावर संमती न दाखवल्या, होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास अमेरिका इराणची उर्जा निर्मिती केंद्रे, पूल अशा महत्त्वाच्या ठिकाणांना बेचिराख करून टाकेल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, इणेरिकेच्या या धमकीला इराणने न जुमानता आम्ही लढत राहू अशी भूमिका इराणने घेतली आहे. दरम्यान आता या सर्व घडामोडी घडत असताना अमेरिकेचे भारतातील राजदूत यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे. अमेरिकेने इराणला दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीने जगाचे लक्ष वेधले आहे.

भारतातील राजदूतासोबत होणार बैठक

मिळालेल्या माहितीनुसा इराणला दिलेली मुदत संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांची एक बैठक होणार आहे. एका बंद दरवाजाआड ही बैठक होणार आहे. बैठकीचा विषय काय असेल? हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु अमेरिका इराणवर हल्ला करण्याआधी अमेरिकेच्या भारतातील राजदूताशी ट्रम्प बैठक घेत असल्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय धमकी दिली?

इराणने आमचा प्रस्ताव न स्वीकारल्यास आम्ही मोठे हल्ले करू असे ट्रम्प यांनी इराणला धमकावलेले आहे. इराणला एका क्षणात उद्ध्वस्त करू शकू असा प्ल्रॅन आमच्याकडे आहे. आम्ही इराणचे उर्जा केंद्रे, अन्य महत्त्वपूर्ण ठिकाणं तसेच पूल उद्ध्वस्त करू असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तर दुसरीकडे इराणनेही अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले आहे. आम्ही इराण तसेच इस्त्रायलविरोधात आमचा लढा सुरूच ठेवू असे इराणने स्पष्ट केलेले आहे.

इस्त्रायलकडूनही केले जातायत हल्ले

दरम्यान, अमेरिकेने इराणला धमकी दिलेली असतानाच दुसरीकडे इस्त्रायलकडूनही इराणवर हल्ले केल जात आहेत. इस्त्रायलने इराणच्या एका रेल्वे लाईनवर हल्ला केला. यामुळे मोठा स्फोट झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहे. याआधी 6 एप्रिल रोजी इस्त्रायलने इराणच्या एका उर्जा केंद्राला लक्ष्य केले होते. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.