RR vs MI : बुमराहच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स, 6 चेंडूत 34 धावा, वैभव सूर्यवंशीचा तडाखा, पाहा व्हीडिओ
GH News April 08, 2026 02:10 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 13 वा सामना हा गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. पावसामुळे हा सामना 20 ऐवजी 11 षटकांचा खेळवण्यात येत आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी या युवा फलंदाजाने राजस्थान रॉयल्सला मुंबई इंडियन्स विरुद्ध आक्रमक सुरुवात करुन दिली. वैभवने डावातील पहिल्याच बॉलवर धमाका केला आहे. वैभवने  अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह याने टाकलेल्या सामन्यातील पहिल्याच ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार लगावला. वैभवने यासह त्याची प्रतिभा दाखवून दिली.

जसप्रीत बुमराह क्रिकेट विश्वातील नंबर 1 गोलंदाज आहे. बुमराहने मुंबई आणि टीम इंडियाला अनेकदा एकहाती सामने जिंकून दिलेत. मात्र अशा स्टार गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर सिक्स मारल्याने वैभवचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. वैभवने 18 व्या मोसमातून आयपीएल पदार्पण केलं. मात्र वैभव-जसप्रीत आमेसामने येण्याची आजची पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे वैभव बुमराहचा कसा सामना करतो याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष होतं. मात्र वैभवने बुमराहसारख्या कसलेल्या गोलंदाजाचं पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकून स्वागत केलं.

बुमराहच्या ओव्हरमध्ये किती धावा?

वैभवने जसप्रीतच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करुन राजस्थानलाही अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. वैभवने या पहिल्या षटकात 14 धावा मिळवल्या. तसेच वैभवने या पहिल्या ओव्हरमध्ये बुमराहच्या बॉलिंगवर 2 सिक्स खेचले. वैभवने बुमराहसह शार्दूल ठाकुर यालाही त्याच्या कोट्यातील पहिल्याच बॉलवर सिक्स लगावला. वैभवने जोरदार फटकेबाजी करुन मुंबईचं टेन्शन वाढवलं. वैभवला रोखणयासाठी रोहित शर्मा,कॅप्टन हार्दिक पंड्या आणि शार्दूल ठाकुर या तिघांनी एकत्र येऊन चर्चा केली. मात्र वैभवने त्याचा झंझावात कायम ठेवला. वैभवने चौफेर फटकेबाजी केली. मात्र शार्दूलनेच वैभवच्या खेळीचा शेवट केला आणि त्याला अर्धशतकापासून रोखलं.

वैभवकडून बुमराहचं सिक्सने स्वागत

वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी

शार्दूलने वैभवला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. मात्र वैभव फटकेबाजी करुन राजस्थानला आक्रमक आणि अपेक्षित सुरुवात करुन देण्यात यशस्वी ठरला. वैभवने गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये 278.57 च्या स्ट्राईक रेटने कमाल बॅटिंग केली.

लाईव्ह स्कोअर

वैभव सूर्यवंशी याने 14 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. वैभवने या 39 पैकी 34 धावा या फक्त 6 चेंडूत केल्या. वैभवने या खेळीत 5 षटकारांसह आणि 1 चौकारही लगावला. वैभव आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी राजस्थानसाठी फक्त 30 बॉलमध्ये 80 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.