होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्याचा शेवटचा प्रयत्न फसला, संयुक्त राष्ट्रात रशिया- चीनकडून नकाराधिकाराचा वापर, पाकिस्तानची दांडी
युवराज जाधव April 08, 2026 02:13 AM

Strait of Hormuz नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढली आहे. अमेरिकेनं इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, इराणनं दुश्मन देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी सुरु केलेली नाही. बहरीननं संयुक्त राष्ट्रांमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर मतदान झालं. मात्र, रशिया आणि चीननं नकाराधिकार वापरला. यामुळं हा प्रस्ताव फेटाळला गेला. 

15 देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बहरीननं होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर 11-2 असं मतदान झालं. पाकिस्तान आणि कोलंबियानं या दोन्ही देशांनी मतदानाला दांडी मारली. होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव बहरीनकडून मांडण्यात आला होता, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यासाठी सर्व प्रकारच्या कारवाईचा प्रस्ताव होता. ज्यात लष्करी कारवाईचा देखील समावेश असता. मात्र, अंतिम ठरावात सुरक्षा परिषदेनं आक्रमक आणि लष्करी कारवाई संदर्भातील बाबी हटवल्या होत्या. ज्या मुंजरीपूर्वी हटवण्यात आल्या होत्या या पार्श्वभमूवीर रशिया आणि चीनकडून नकाराधिकाराचा वापर करण्यात आला.  

संस्कृतीचा नाश करण्याचा ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, जी पुन्हा कधीही परत येणार नाही, असा इशारा दिला. ट्रम्प पुढे म्हणाले की,मला असं व्हावं असं वाटत नाही, पण कदाचित तसं होईल. मात्र, आता संपूर्ण  सत्ताबदल झाले आणि बुद्धिमान, कमी कट्टर विचारांचे लोक आले तर तिथे कदाचित काहीतरी क्रांतिकारी आणि अद्भुत घडू शकतं. कोण जाणे? आपण आज रात्री हे पाहू. जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असेल. 47 वर्षांची भ्रष्टाचारी, खंडणीखोर मृत्यूची कारकीर्द   अखेर संपेल. इराणच्या महान जनतेवर देवाची कृपा असो!, अशी धमकी इराणला ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे, असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला. 

रशिया आणि चीननं नकाराधिकार का वापरला?

संयुक्त राष्ट्रात होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव आणला गेला होता. त्यावर मतदान देखील झालं मात्र हा प्रस्ताव फेटाळला गेला. रशिया आणि चीन यांनी या प्रस्तावावर मतदान करताना नकाराधिकार वापरला. रशिया आणि चीन हे दोन्ही देश होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास कोणत्याही प्रकारे बळाचा वापर करु नये अशी भूमिका घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रमाण वेळेनुसार 8 वाजण्यापूर्वी संयुक्त राष्ट्रात हा प्रस्ताव फेटाळला गेला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.