पुणे ः क्रिकेट पटू हार्दीक पांड्या विरोधातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रार अर्जाची पुढील चौकशी संबंधित अधिकारक्षेत्रानुसार गुजरात येथील अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी तक्रारदार वाजेद खान (बीडकर) समजपत्र देत ही माहिती दिली.
क्रिकेट पटू हार्दिक हिमांशू पांड्या (रा. खार पश्चिम, मुंबई) यांच्याविरोधात ॲड. वाजेद खान यांनी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा तक्रार अर्ज दाखल केला होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा अर्ज दिला होता. अर्जाचे अवलोकन केल्यानंतर संबंधित घटना अहमदाबाद येथे (गुजरात) नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर ८ मार्च २०२६ रोजी घडल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार हा अहमदाबाद पोलिसांकडे आहे. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी तक्रार अर्ज पुढील कारवाईसाठी पोलिस आयुक्त, अहमदाबाद यांच्याकडे वर्ग केला आहे.