Maharashtra News Live Update: अंजनगाव पुतळा प्रकरणी कारवाई, बाळराजे आवारेसह आणखी एक सहकारी पोलिसांच्या ताब्यात
Saam TV April 08, 2026 10:45 AM
Dharashiv: येरमाळा येथील श्री येडेश्वरी यात्रेच्या समारोप कार्यक्रमात गोंधळ

धाराशिव -

येरमाळा येथील श्री येडेश्वरी यात्रेच्या समारोप कार्यक्रमात गोंधळ

येडेश्वरी देवीची मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या खांदेकऱ्यांना मारहाण

मारहाणी वरून गावात तणाव, मारहाण करणाऱ्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी येरमाळा गावचे गावकरी जमले येरमाळा पोलीस स्टेशन समोर

गुंडावर कार्यवाही करा या मागणीसाठी गावकऱ्यांनी सुरू केला रास्ता रोको व ठिय्या आंदोलन

येरमाळा पोलीस स्टेशन समोर गेल्या अडीच तासापासून गोंधळ

Solapur: अंजनगाव पुतळा प्रकरणी कारवाई, बाळराजे आवारेसह आणखी एक सहकारी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर -

अंजनगाव पुतळा प्रकरणी आणखी एक कारवाई

अंजनगावला पुतळा पाठवणाऱ्या बाळराजे आवारेसह आणखी एक सहकारी पोलिसांच्या ताब्यात

संभाजी आघाव असे सोलापूर ग्रामिण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नावं

माढा पोलिसांकडून आघाव याच्या अटकेची कारवाई सध्या सुरूय

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.