नवी दिल्ली: भारताच्या पलक व मुकेश नेलावल्ली या जोडीने नेमबाजी विश्वकरंडकात विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर मोहर उमटवली. पलक व मुकेश या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात चीनच्या हू केई-कियानशून या विश्वविजेत्या जोडीला पराभूत करताना सुवर्णपदकावर हक्क सांगितला. चीनच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हंगेरीच्या वेरोनिका मेजर-ॲकोस कॅरोली नॅगी या जोडीने ब्राँझपदकाची कमाई केली.
१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. तब्बल ४२ देशांतील खेळाडू या प्रकारात सहभागी झाले. यामधून फक्त चारच देशांच्या जोड्यांना अंतिम फेरीमध्ये वाटचाल करता आली. यामध्ये भारत, चीन, हंगेरी व अमेरिका या चार देशांच्या जोड्यांचा समावेश होता.
Sabarimala Temple Verdict: केरळमधील शबरीमलात महिलांना प्रवेशाचा निर्णय चुकीचा; मंदिराबाबत सरकारची भूमिका, न्या. नागरत्ना यांचा आक्षेप!चीनच्या जोडीने ५८६ गुणांसह पहिले स्थान पटकावले. भारताच्या जोडीने ५८१ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. हंगेरीच्या जोडीने ५८० गुणांसह तिसरे स्थान पटकावले. अमेरिकेच्या जोडीने ५७८ गुणांसह चौथ्या स्थानावर मुसंडी मारली.
पलक व मुकेश नेलावल्ली या जोडीने अंतिम फेरीत मोठी झेप घेतली. पात्रता फेरीमध्ये दुसरे स्थान मिळवलेल्या भारतीय जोडीने अंतिम फेरीमध्ये ४८७ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. यामुळे भारतीय जोडीला सुवर्णपदकावर हक्क सांगता आला. चीनच्या जोडीला ४८४ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हंगेरीच्या जोडीने ४१४ गुणांसह ब्राँझपदक पटकावले.
Parbhani News: वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा; नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का? सहकारी खेळाडूशी स्पर्धासुवर्णपदक पटकावल्यानंतर पलक व मुकेश नेलावल्ली या दोघांनीही आनंद व्यक्त केला. पलक म्हणाली की, आम्ही या स्पर्धेमध्ये पदक जिंकण्यासाठी सहभागी झालो होतो. त्यामुळे आमचे ध्येय साकार झाले. तसेच मुकेश व मी पहिल्यांदाच एकत्रमध्ये खेळलो. अंतिम फेरीमध्ये मनाजोगता खेळ करता आला. दरम्यान, मुकेश नेलावल्ली म्हणाला की, खरेतर मी या लढतीत पलकशीच स्पर्धा करीत होतो. तिच्यापेक्षा चांगले गुण मिळवण्याचा माझा प्रयत्न होता.