'बाप्या'मधील 'हळदीत माखले' गाण्याची धम्माल रंगत; लग्नसोहळ्यांना मिळणार भन्नाट एनर्जीचा नवा तडका
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 08, 2026 11:13 AM

Bapya Upcoming Marathi Movie Song: वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत 'बाप्या' (Bapya Marathi Movie) या आगामी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता त्या उत्सुकतेला आणखी रंग चढवत चित्रपटातील पहिले गाणे 'हळदीत माखले' (Haldit Makhle Song) प्रदर्शित झाले असून, सध्या हे गाणे सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चेत आहे.

लग्नातील हळदी समारंभ म्हटलं की रंग, नाच, जल्लोष आणि मस्ती... आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा भन्नाट संगम 'हळदीत माखले'मध्ये अनुभवायला मिळतो. गाण्याची सुरुवात होताच त्याचे  बीट्स आणि वाईब प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला भाग पाडणारी आहे. प्रत्येक लग्नसोहळ्यात आवर्जून वाजेल, असे हे गाणं आहे. अभय जोधपूरकर यांच्या खास आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे. शौनक नारळे (असर) यांच्या शब्दांमध्ये हळदीच्या क्षणांचं सुंदर चित्र रंगवलं गेलं आहे, तर अभिजीत चंद्रकला यांच्या संगीताने या गाण्याला भन्नाट, डान्सफ्लोरवर थिरकायला लावणारी एनर्जी दिली आहे.

दिग्दर्शक समीर तिवारी म्हणतात, "हळदी समारंभ हा फक्त एक विधी नसतो, तो प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा, मोकळेपणाने जगण्याचा आणि नात्यांना रंग देण्याचा उत्सव असतो. 'हळदीत माखले' तयार करताना आम्ही त्या प्रत्येक क्षणाला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. या गाण्यातील प्रत्येक बीट, प्रत्येक स्टेप आणि प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना थेट त्यांच्या स्वतःच्या लग्नाच्या आठवणीत घेऊन जाईल, असा आमचा विश्वास आहे. हे गाणं ऐकल्यावर कोणीही शांत बसणार नाही. प्रत्येकाला उठून नाचावंसं वाटेल, इतकी त्यात ऊर्जा आहे. आजच्या लग्नसोहळ्यांमध्ये प्रत्येकाला काहीतरी हटके आणि एंटरटेनिंग हवं असतं. 'हळदीत माखले' हे गाणं अगदी तसेच आहे. येत्या काळात प्रत्येक हळदी समारंभात हे गाणं हमखास वाजताना आणि लोक त्यावर मनसोक्त थिरकताना दिसतील, याची आम्हाला खात्री आहे."

समीर तिवारी दिग्दर्शित 'बाप्या' या चित्रपटाची निर्मिती मुत्कल तिवारी आणि समीर तिवारी यांनी केली आहे. येत्या 15 मे 2026 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हळदीचं धम्माल गाणं ऐकलंत?

Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: 'एका बाईच्या वाजल्या बांगड्या, की सगळ्या बाप्यांच्या थरथरल्या तंगड्या...'; गूढ वाढवणाऱ्या 'तुंबाडची मंजुळा'चा टीझर पाहिलात?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.