अमेरिकेला जिरवणाऱ्या जिगरबाज इराणला समजून घेण्यासाठी हे 'इराणी' 25 चित्रपट पाहिलेच पाहिजेत! दोन ऑस्कर विजेते ते चिमुरड्यांचा ठाव घेणारे ते अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या कलाकृती
परशराम पाटील, एबीपी माझा April 08, 2026 03:43 PM

25 Iranian Films You Should Watch: जेव्हा अमेरिकेची महाकाय युद्धनौका आणि महाभयंकर क्षेपणास्त्रे इराणला अश्मयुगात नेण्याची भाषा करत होती, तेव्हा याच इराणच्या मातीत 'ह्युमन शील्ड' (मानवी साखळी) त्यांच्यासमोर ढाल बनून उभी ठाकली. रणांगणावर शस्त्रांना आपल्या निर्धाराने बोथट करणाऱ्या इराणने केवळ लष्करीच नव्हे, तर नैतिक विजयही मिळवला आहे. पण इराणची ही 'फायटिंग स्पिरीट' आजची नाही; ती त्यांच्या रक्तात आणि त्यांच्या जागतिक दर्जाच्या सिनेमात अनेक दशकांपासून प्रतिबिंबित होत आहे.

ज्याप्रमाणे इराणने रणांगणावर अमेरिकेला जेरीस आणले, त्याचप्रमाणे जागतिक चित्रपट महोत्सवांमध्येही इराणच्या साध्या पण वास्तववादी सिनेमांनी हॉलिवूडच्या झगमगाटाची मती गुंग केली आहे. इराणच्या या अभूतपूर्व यशाच्या  निमित्ताने, जागतिक सिनेमाचा नकाशा बदलणाऱ्या 25 सर्वोत्कृष्ट इराणी चित्रपटांचा हा विशेष आढावा.

नंबर चित्रपटाचे नाव दिग्दर्शक हा चित्रपट का पाहिला पाहिजे?
1 A Separation (2011) Asghar Farhadi ऑस्कर विजेता; मानवी नातेसंबंधांचा जागतिक मास्टरपीस.
2 Taste of Cherry (1997) Abbas Kiarostami Palme d’Or' विजेता; इराणी सिनेमाचा जागतिक चेहरा.
3 Children of Heaven (1997) Majid Majidi पहिला ऑस्कर नामांकित चित्रपट
4 Close-Up (1990) Abbas Kiarostami वास्तव आणि कल्पनेची उत्कृष्ट सांगड घालणारा जगातील टॉप चित्रपट.
5 The Salesman (2016) Asghar Farhadi दुसरा ऑस्कर मिळवून देणारा आणि इराणचा दबदबा सिद्ध करणारा.
6 Where Is the Friend's House? (1998) Abbas Kiarostami साध्या कथेतून मानवी मूल्यांचा वेध घेणारा महान चित्रपट.
7 The Color of Paradise (1999) Majid Majidi निसर्ग आणि ईश्वराचा शोध घेणारी एक हृदयस्पर्शी कलाकृती.
8 About Elly (2009) Asghar Farhadi थरार आणि सामाजिक सत्याचा उत्कृष्ट मेळ.
9 The Circle (2000) Jafar Panahi स्त्री-स्वातंत्र्याचा टोकदार प्रश्न मांडणारा 'Golden Lion' विजेता.
10 The Wind Will Carry Us (1999) Abbas Kiarostami जीवन आणि मृत्यूवर भाष्य करणारा काव्यात्मक सिनेमा.
11 Baran (2001) Majid Majidi प्रेम आणि त्यागाची एक आर्त कहाणी.
12 Turtles Can Fly (2004) Bahman Ghobadi युद्धाचे बालमनावर होणारे भयानक परिणाम दाखवणारा धक्कादायक चित्रपट.
13 The Song of Sparrows (2008) Majid Majidi गरिबीतही टिकून राहणाऱ्या माणुसकीचे दर्शन.
14 Through the Olive Trees (1994) Abbas Kiarostami बालपण आणि जबाबदारी यांचा सुंदर चित्रपट
15 The White Balloon (1995) Jafar Panahi छोट्या मुलीला गोल्फ बॉल विकत घ्यायचा असतो आणि ती शोध घेते
16 A Moment of Innocence (1996) Mohsen Makhmalbaf क्रांती आणि वैयक्तिक आयुष्याचा संघर्ष.
17 The Stoning of Soraya M. (2008) Cyrus Nowrasteh अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा अंगावर काटा आणणारा चित्रपट.
18 Offside (2006) Jafar Panahi स्त्रियांच्या हक्कांवर भाष्य करणारा उपरोधिक सिनेमा.
19 The Runner (1984) Amir Naderi इराणी सिनेमाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक चित्रपट.
20 And Life Goes On (1992) Abbas Kiarostami विनाशानंतरही पुन्हा उभ्या राहणाऱ्या जिद्दीची गाथा.
21 The Lizard (2004) Kamal Tabrizi धर्मांधतेवर प्रहार करणारा इराणचा सर्वात लोकप्रिय विनोदी चित्रपट.
22 The Patience Stone (2012) Atiq Rahimi युद्धातील स्त्रीच्या वेदनेला वाचा फोडणारी कलाकृती.
23 Buddha Collapsed Out of Shame (2007) Hana Makhmalbaf शिक्षणासाठी असलेल्या संघर्षाचे सुंदर चित्रण.
24 The White Meadows (2009) Mohammad Rasoulof प्रतिकात्मक आणि काव्यात्मक भाषेतून व्यवस्थेवर टीका.
25 Beautiful City (2004) Asghar Farhadi न्यायव्यवस्थेतील गुंतागुंत मांडणारा दिग्दर्शकाचा सुरुवातीचा काळ.

कुठे चित्रपट पाहता येतील?

Netflix, MUBI, Criterion Channel, YouTube (काही सबटायटल्स सह) किंवा Amazon Prime वर बहुतेक उपलब्ध आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.