वयाच्या 20 व्या वर्षीच अशोक खरातने महिला नातवाईकासोबत.. शी.. जे केलं त्यासाठी गाववाल्यांनी धरुन चोपलेला
Tv9 Marathi April 08, 2026 05:45 PM

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याच्या वाईट कृत्यांची यादी दिवसागणिक मोठी होत आहे. आता अनेक महिलांनी अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत. पण वयाच्या 20 व्या वर्षीच खरातने नातेवाईक महिलेसोबत नको ते कृत्य केलं होतं. आता पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत असताना आणखी एक मोठं आणि धक्कादायक रहस्य समोर आलं आहे. अशोक खरातचं 46 वर्ष जुनं प्रकरण देखील आता समोर आलं आहे. 1980 मध्ये भोंदूबाबाने कुटुंबातील महिलेचं लैंगिक शोषण केलेलं… त्यानंतर तो गावातून फरार झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरण 46 वर्ष जुनं आहे… 1980 मध्ये जेव्हा अशोक खरात फक्त 20 वर्षांचा होता. तेव्हा त्याने महिला नातवाईकासोबत घाणेरडं कृत्य केलं होतं… त्यानंतर तो 15 वर्ष गावातून फरार होता… संबंधित प्रकरण आता चर्चेत आलं, कारण पोलीस त्याचे सर्व जुने रेकॉर्ड तपासत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक उर्फ लक्ष्मण खरात 20 वर्षांचा होता, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात त्याने एका महिलेला जादूटोण्याच्या जाळ्यात ओढलं. ही महिला त्याची दूरची नातेवाईक होती. महिलेला मुलं होत नव्हतं अशात, खरातने तावीज व विधींच्या नावाखाली तिचा गैरफायदा घेतला आणि तिचं लैंगिक शोषण केलं.

खरात याने महिलेचं लैंगिक शोषण केलं… असं संपूर्ण गावाला कळलं… तेव्हा गावातील वातावरण तणावग्रस्त झालं होतं… गावातील लोकांनी त्याला मारलं देखील होतं… अशात घाबरलेल्या अवस्थेत खरात याने एका रात्रीत गाव सोडलं… त्यानंतर तब्बल 15 वर्ष तो कुठे होता, कोणात्या संरक्षणात होता आणि काय करत होतं… हे एक मोठं रहस्य आहे.

लक्ष्मण झाला अशोक खरात…

जवळपास 15 वर्ष बेपत्ता राहिल्यानंतर, तो अचानक त्याच्या मूळ गावी, काहंदलवाडी येथे परतला. असं देखील सांगितलं जातं की, त्याने स्वतःचं नाव बदलून अशोक खरात असं ठेवलं होतं… भोंदूबाबा 15 वर्षांच्या अज्ञातवासात नक्की काय करत होता… याचा शोध पोलीस घेत आहेत. अशोक खरातच्या भूतकाळातील काळे पैलू आता उघड होत आहेत.

सांगायचं झालं तर, अशोक खरात याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.  मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू अशोक खरातशी संबंधित 15 ते 17 अश्लील व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि पॉर्न साईट्सवर व्हायरल करण्यात आले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.