टाईपिंग करता न आल्याने तीन कनिष्ठ लिपिकांना शिपाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही घटना घडली आहे. शासकीय नियमांनुसार कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना एका मिनिटांत किमान २५ शब्द टाइप करता येणे आवश्यक आहे. मात्र, यात तिघेही कमी पडल्याने त्यांचं डिमोशन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ यादव, अमित कुमार यादव आणि नेहा श्रीवास्तव अशी या तीन कर्मचाऱ्यांची नावं आहेत. २०२४ मध्ये झालेल्या टायपिंग परीक्षेत तिघेही नापास झाले होते. त्यावेळी प्रशासनाने तात्काळ कारवाई न करता त्यांना सुधारण्याची संधी दिली होती. पुढील वेळी ते आपली उणीव भरून काढतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
Chhatrapati Sambhajinagar: शिक्षण क्षेत्रात खळबळ! 12 वीच्या परीक्षेत काॅपी, केंद्र संचालकासह २४ जणांवर गुन्हे, बोर्ड करणार चौकशी..दरम्यान, आता पुन्हा त्यांची टायपिंगची परीक्षा घेण्यात आली. ही त्यांच्यासाठी निर्णायक संधी होती. मात्र या परीक्षेतही तिघे नापास झाले. सलग दुसऱ्यांदा टायपिंग परिक्षेत नापास झाल्याने प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांनी तिघांना कनिष्ठ लिपिक पदावरून कमी करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदावर नेमण्याचे आदेश दिले.
Chhatrapati Sambhajinagar: कॉपीमुक्तीसाठी आता ॲक्शन; दहावीचे उद्यापासून पेपर, १.९२ लाख विद्यार्थी, ६४३ केंद्रे सज्ज!या कारवाईनंतर शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजातील शिस्त आणि कार्यक्षमता याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नियमांचे पालन न केल्यास कठोर पावले उचलली जातील, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.