संदेश पेवेकर यांचे उपोषण पुन्हा सुरू
esakal April 08, 2026 06:45 PM

-rat७p३१.jpg-
P26O36005
खेड ः धामणदिवी ग्रामपंचायत विरोधात उपोषणास बसलेले माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर
----
संदेश पेवेकर यांचे उपोषण सुरू
धामणदिवी ग्रामपंचायत ; कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ८ : धामणदिवी ग्रामपंचायतीमध्ये जीईएम पोर्टल खरेदीत घोटाळा आणि विकास कामात अनियमितपणाबाबत कारवाईचे आश्वासन देऊनही गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासनाला हरताळ फासल्याचा आरोप करत आज माजी सदस्य संदेश पेवेकर यांनी येथील उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायतीमध्ये जीईएम पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या खरेदी व विकास कामांमध्ये अनियमितपणा आणि अपहार प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली. जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश देऊन दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले. गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी तसे लेखी आश्वासन संदेश पेवेकर यांना दिले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता न करता, दोषींवर कायदेशीर कारवाई न करता, त्यांना अभय दिल्याचा आरोप करत पेवेकर यांनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.