भोर न्यायालयात ७० जणांची तपासणी
esakal April 08, 2026 06:45 PM

हिर्डोशी, ता. ८ : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, भोर तालुका विधी समिती व उपजिल्हा रुग्णालय भोर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून भोरच्या दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर येथे मंगळवारी (ता. ७) झालेल्या आरोग्य शिबिरात ७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
दिवाणी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश नेहा नागरगोजे यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. सह दिवाणी न्यायाधीश मीना जाधव व शशांक शिरसाट, सरकारी अभियोक्ता केतन देशमुख आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गुडे, डॉ. आनंद साबणे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील पाटणे, डॉ. कविता भाेसले आदींनी तपासण्या केल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.