लवकरच युद्धाचं सर्वात भयानक रुप, पाकिस्तानातील बैठकीआधीच खळबळ; इराणच्या भूमिकेने चिंता वाढली!
GH News April 08, 2026 08:15 PM

America Iran Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी ही शस्त्रसंधी झाली असून या काळात युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा होणार आहे. ही शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी चीन आणि अमेरिकेने महत्त्वाची भूमिका पार पडली आहे. दरम्यान, आता शस्त्रसंधी घडून आल्यानंतर येत्या शुक्रवारी म्हणजेच 10 एप्रिल रोजी पाकिस्तानात दोन्ही देशांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. एकीकडे या बैठकीची तयारी केली जात असताना इराणने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. इराणच्या या भूमिकेमुळे सध्या जरी शस्त्रसंधी झाली असली तरीही भविष्यात युद्ध पुन्हा भडकणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानत 10 एप्रिल रोजी काय होणार?

इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर लगेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली आहे, अशी घोषणा केली. त्यानंतर येत्या 10 एप्रिल रोजी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथ दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक होईल. या बैठकीत दोन्ही देशांमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

इराणने काय वेगळी भूमिका घेतली?

अमेरिकेसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर इराणने काहीशी कठोर भूमिका घेतली आहे. ही शस्त्रसंधी म्हणजे आमचा विजय आहे, असे इराणने जाहीर केले आहे. तसेच येत्या शुक्रवारी पाकिस्तानात अमेरिकेसोबत आमची बैठक होईल. परंतु या बैठकीचा अर्थ युद्ध संपले असा होत नाही, अशी इराणने स्पष्ट भूमिका घेतली आहे. म्हणजेच इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराणची बैठक होत असली तरीही योग्य तो तोडगा न निघाल्यास पुन्हा युद्ध भडकू शकते, असा याचा अर्थ काढला जात आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? अशी चिंता वाढवणारा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कच्च्या चेलाचा भाव 17 टक्क्यांनी घसरला

दरम्यान, या तात्पुरत्या शस्त्रसंधीनंतर जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. शस्त्रसंधी होताच कच्च्या तेलाची किंमत 17 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे भारतातील इंधन टंचाईही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.