Uday Samant : एकनाथ शिंदे नेहमीच अॅक्शन मोडवर असतात असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. आज संपर्क प्रमुखांच्या बैठका झाल्या आहेत. आत्ता लोकसभा नाही तर तालुका स्तरावर आपण गेलं पाहिजे यासाठी काम सुरु आहे. आता निवडणूक नाही, त्यामुळं संघटना बांधणीवर लक्ष दिला जाईल असे सामंत म्हणाले. जे काम करणार नाहीत, त्यांना पदावरुन बाजूला केलं जाईल. नव्या कार्यकर्ते संधी दिली जाईल, त्यांना पद दिली जाईल असे सामंत म्हणाले. जे सक्षमपणे काम करताय ते पुढे काम करत राहतील, ज्यांचं काम नीट नाही त्यांना बाजूला केलं जाईल. काही ठिकाणी काही वेळासाठी पदापासून बाहेर ठेवलं जाईल असेही सामंत म्हणाले.
मुंबई संदर्भात सुद्धा आत्ताच एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. त्यात संपर्क प्रमुख म्हणून श्रीकांत शिंदे नेतृत्व करतील. त्यांच्या सोबत निलेश राणे, योगेश कदम, राहुल शेवाळे हे काम करतील असे उदय सामंत म्हणाले.
MIDC बाबात येणाऱ्या अडचणी आणि नुकसानीबाबत बोलताना सामंत म्हणाले की, हा गैरसमज पसरवला जातोय कामगार कमी होतील. सगळ्यात मोठी अडचण होती ती इंधनची होती. पाईपलाइन गॅस जिथे नव्हते तेथे अडचणी येत होत्या. कामगाराची अडचण नाही असे ते म्हणाले. मी छत्रपती संभाजीनगर, अंबरनाथ, पिंपरी चिंचवड MIDC ची बैठक घेतली आहे. तिथे नुकसान झालं आहे, हे मान्य करतो पण नुकसान कसं कमीत कमी होईल किंवा त्यासाठी काय करता येईल? यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सामंत म्हणाले. नाशिक अत्याचार प्रकरणी बोलताना सामंत म्हणाले की, अशा प्रकारची प्रवृत्ती कुठल्याही समाजात असू द्यात ती ठेचली गेली पाहिजे. पडळकर काय बोलले हे मला माहित नाही, पण अशी प्रवृत्ती समाजात नको असे सामंत म्हणाले.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांची माहिती आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाही त्यांना डच्चू देणार, असे स्पष्ट आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळेच मागील आठवड्यात पुण्यात शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली गेली. यातून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला आहे. ज्यांना मंत्री, आमदार, खासदार, संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आघाडी, जिल्हा आणि शहर प्रमुख तसेच शाखा प्रमुखांच्या कामाचा आढावा देखील स्वतः एकनाथ शिंदे घेऊन त्याचे परीक्षण करणार असल्याने ज्यांना पद आहे, त्यांने पक्ष संघटना वाढीसाठी काम केलेच पाहिजे असेच निर्देश बघायला मिळत आहेत.