श्री शिवशंभू स्मारकाजवळील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
esakal April 08, 2026 10:45 PM

तळेगाव स्टेशन, ता. ८ : श्री शिवशंभू तीर्थ स्मारक परिसराला अतिक्रमणांनी गराडा घातल्याने त्याचे पावित्र्य धोक्यात येत आहे. स्मारकाच्या १०० मीटर त्रिज्येतील अतिक्रमणे हटवण्याची मागणी श्री शिवशंभू स्मारक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
श्री शिवशंभू तीर्थ स्मारक अनावरण चार महिन्यांपूर्वी झाले. त्याच्या अवतीभवती नियमबाह्य शेड, टपऱ्या उभारून अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. परिणामतः स्मारकाचा परिसर बकाल होत चाललेला आहे. स्मारकाचे व परिसराचे पावित्र्य लक्षात घेता परिसरामध्ये मांसाहारी खाद्यपदार्थ, मद्य, गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट, बिडी आदींच्या विक्रीवर पूर्णतः प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. अतिक्रमणे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईद्वारे प्रतिबंध करावा अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना निवेदनात केली आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, श्री शिवशंभू स्मारक संस्थेचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील उपस्थित होते. आमदार सुनील शेळके, श्रीकांत मेढी, ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, सुरेश दाभाडे, अमोल शेटे, संदीप जगनाडे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.