पोर्ले तर्फ ठाणेमध्ये खाऊ गल्लीचे आयोजन
पोर्ले तर्फ ठाणे ः येथील प्राथमिक शाळा नंबर दोनमध्ये आज खाऊ गल्लीचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांच्या हस्ते झाले. तालुका पंचायत सदस्या उज्वला सासने अध्यक्षस्थानी होत्या. खाऊ गल्लीत ९४ मुला-मुलींनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रमुख पाहुणे भगवान पाटील, उज्वला सासने, अमित चौगुले, सतीश सासने, दयानंद चौगुले आदींनी खाद्यपदार्थांची चव घेत खरेदी केली.
मुख्याध्यापिका शिवानी शेटे, अध्यापक अमोल साळवी, नंदिनी कुंभार, वैशाली बुचडे, यांनी परिश्रम घेतले. दादासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.