माजी रणजीपटू सुनील मोरे १२ ला चिपळुणात
esakal April 08, 2026 10:45 PM

-ratchl८२.jpg-
P26O36149
सुनील मोरे
-----------
रणजीपटू सुनील मोरे रविवारी चिपळुणात
चिपळूण ः शहरात रविवार (ता.१२) सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबईचे माजी रणजीपटू आणि निवड समिती सदस्य सुनील मोरे उपस्थित राहणार आहेत. क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, दमदार फलंदाजी आणि मुंबई क्रिकेटमधील भक्कम कारकीर्द यामुळे सुनील मोरे हे नाव राज्यातील क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचे ठरणार आहे. १९९२ ते १९९६ या कालावधीत मोरे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे सलामीवीर म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. त्यांनी २५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४४च्या सरासरीने तब्बल १५०३ धावा केल्या होत्या. १९९०च्या दशकात चिपळूणमध्ये झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे चिपळूणशी त्यांचा संबंध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.