या प्रकारे पाणी पिता ? कोणती सवय किडनीला घातक? काय म्हणतात युरोलॉजिस्ट ?
GH News April 09, 2026 11:13 PM

पाणी पिण्याला अनेक जण तितकेसे महत्व देत नाहीत. तहान लागली तर पाणी प्यायचे, अन्यथा पाण्याला स्पर्श करायचा नाही. या सवयीचा किडनीवर मोठा दुरगामी परिणाम होतो. किडनी या छोटा अवयव रक्ताचे शुद्धीकरण करतो, शरीरातील टॉक्सिन बाहेर काढतो, इलेक्ट्रोलाईट संतुलित राखतो आणि द्रव पदार्थांची पातळी स्थिर करतात. जेव्हा शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर किडनीला जास्त मेहनत करावी लागते. याने केवळ थकवा येत नाही तर दीर्घकाळाने किडनी स्टोन, युरिन इन्फेक्शन आणि क्रॉनिक किडनी डिसिजचा धोका वाढू शकतो. चला या संदर्भात तज्ज्ञांचे मत काय आहे हे पाहूयात…

पाण्यासंदर्भात काय गैरसमज ?

अनेकजण समजतात की दिवसभर चहा, कॉफी वा ज्यूस प्यायल्याने पाणी कमी प्यायले तरी चालेल. मात्र, कॅफीन आणि साखरेचे ज्यूस शरीरातील पाणी वेगाने बाहेर काढू शकतात. आणखी एक गैरसमज असतो की जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायचे. मात्र, जेव्हा तहान लागते तेव्हा शरीर साधारण डिहायड्रेट झालेले असते आणि किडनीवर दबाव आलेला असतो. दुसरीकडे काही जण पाणी प्यायलेले चांगले असल्याने गरजेपेक्षा जास्त पाणी पितात. मात्र कमी काळात तीन ते चार लिटर वा त्याहून जास्त पाणी पिणे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे रक्तातील सोडीयमची पातळी घसरु शकते. ज्याला हायपोनेट्रेमिया म्हटले जाते. गंभीर प्रकरणात यामुळे मेंदूला सूज, फिट्स वा कोमापर्यंतची स्थिती ओढावू शकते.

काय म्हणतात डॉक्टर?

किडनीला संतुलित प्रमाणात पाण्याची गरज असते. खूप कमी किंवा खूप जास्त पाणी दोन्ही धोकादायक ठरु शकते. सतत कमी पाणी प्यायल्याने लघवी दाट होते. ज्यामुळे स्टोन आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. तसेच डायबिटीज वा हृदय रोगाशी झुंजणाऱ्या लोकांना जरुरीपेक्षा जास्त तरल पदार्थ घेतल्याने शरीरावर जास्त दबाव वाढतो असे युरोलॉजिस्ट डॉ. अजय अग्रवाल यांनी म्हटले आहे.

कोणी किती पाणी प्यावे ?

एक्सपर्टच्या मते ८ ग्लास पाण्याचा नियम सर्वांसाठी लागू होत नाही. सर्वसाधारण महिलांना २.२ लिटर आणि पुरुषांना ३ लिटर द्रवपदार्थाची गरज असते. परंतू हे हवामान, घाम, व्यायाम आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. लघवीचा रंग नेहमीच संकेत देत असतो. हलका पिवळा रंग योग हायड्रेशनचा संकते देतो. लघवीला जर खूप जास्त पिवळा रंग पाण्याची कमरता आणि अधिक स्वच्छ लघवी जास्त पाणी झाल्याचे संकेत देत असते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.