IPL 2026: गुजरात टायटन्सच्या पहिल्या विजयावर विरजन, कर्णधार शुबमन गिलला बसला मोठा फटका
GH News April 09, 2026 11:13 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सला एका पाठोपाठ एक दोन पराभवाचे धक्के बसले. त्यामुळे गुजरात टायटन्स संघ पहिल्या विजयासाठी आतुर होता. खरं तर तिसऱ्या सामन्यात विजय जवळपास हातातून गेला होता. पण डेविड मिलरने केलेल्या चुकीमुळे गुजरात टायटन्सला विजयी फायदा झाला. हा सामना गुजरात टायटन्सने फक्त एका धावेने जिंकला आणि पहिल्या विजयाची नोंद केली. गुजरातच्या खात्यात दोन गुणांची कमाई झाली आहे. पण या विजयावर विरजन पडलं आहे. कारण गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट नियमाचं उल्लंघन केलं. 14 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संथ गतीने षटके टाकल्याबद्दल गुजरातचा कर्णधार गिलला दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएल आचारसंहिता 2.22 चे उल्लंघन करून दंड आकारण्याची ही संघाची पहिलीच वेळ आहे. यासाठी बीसीसीआयने कर्णधार शुबमन गिलला 12 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. बीसीसीआयने एका निवेदनात शुबमन गिलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियमांनुसार 30 यार्ड वर्तुळात एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवणे आवश्यक असल्याने दबाव आणखी वाढला. या पर्वात शुबमन गिलच्या आधी श्रेयस अय्यरला फटका बसला आहे. त्याने दोन वेळा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केला आहे. पहिल्यांदा चूक केली तेव्हा 12 लाखांचा दंड ठोठावला होता. दुसऱ्या सामन्यात अशीच चूक केल्यानंतर 25 लखांचा दंड ठोठावला गेला. पण तिसर्‍या सामन्यात अशीच चूक केल्यास त्याला एका सामन्यासाठी निलंबित केलं जाईल. श्रेयस अय्यरला आता यापुढे काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा एका सामन्याला मुकावं लागू शकतं.

आयपीएल स्लो ओव्हर रेट नियम काय आहे?

आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात 20 षटकं नियोजित वेळेत पूर्ण करायची असतात. जर केलं नाही तर स्लो ओव्हर रेट मानलं जातं आणि कर्णधाराला दोषी धरलं जातं. एक डाव 90 मिनिटात पूर्ण करणं भाग असतं. टाईम आऊट आणि इतर ब्रेक वगळरून मिनिटं मोजली जातात. ठरलेल्या वेळेत षटकं होतात की नाही याचा अंदाज घेतला जातो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.