शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, त्यामुळं ते शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत मीच करेन : आमदार महेश शिंदे
वैभव बोडके April 10, 2026 12:13 AM

Mahesh Shinde on Shashikant Shinde :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)  हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळं ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत मीच करेन असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी केलं. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे (Priya Shinde President of the Satara Zilla Parishad)   यांच्या कुणबी दाखल्याबद्दल देखी त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्याकडून ओबीसींवर कोणताही अन्याय झाला नसून समोरून कुणबी उमेदवार दिल्याने आम्ही देखील कुणबी उमेदवार दिला असल्याचे स्पष्टीकरण आमदार महेश शिंदे यांनी दिले आहे. 

आमच्याकडून ओबीसींवर कोणताही अन्याय झाला नाही

सातारा (satara) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी अध्यक्ष पदाच्या निवळीवेळी सादर केलेला कुणबी दाखला हा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आले असल्याची याचिका काल दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज शिवसेनेचे कोरेगावचे आमदार व अध्यक्षा प्रिया शिंदे यांचे पती महेश शिंदे पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी प्रिया शिंदे यांच्या माहेरकडील वंशावळीमध्ये कुणबी हा उल्लेख असल्याने हा दाखला वैध असल्याचे सांगितले. दरम्यान, ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत मीडिया ट्रायल करु नये, असे आवाहन देखील त्यांनी केले. दरम्यान, आमच्याकडून ओबीसींवर कोणताही अन्याय झाला नसून समोरून कुणबी उमेदवार दिल्याने आम्ही देखील कुणबी उमेदवार दिला असल्याचे स्पष्टीकरण आमदार महेश शिंदे यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्यांना देखील उपहासात्मक टोला लगावला. 

शशिकांत शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा महेश शिंदेंनी दिला सल्ला

शशिकांत शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर विचारले असता आमदार महेश शिंदे म्हणाले की असं असेल तर मी त्यांचे स्वागत करेन. मी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नेतृत्व मान्य करुन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देखील दिला असल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून आगामी काळामध्ये व्यवस्थित होईल, असे देखील आमदार महेश शिंदे म्हणाले. 

Satara News: महायुती असताना मविआसोबत का जायचं, साताऱ्यातील राड्याप्रकरणी महेश शिंदेंनी शिंदेंच्या शिवसेनेला इतिहासाची आठवण करुन दिली!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.