आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) सलग दुसऱ्याचा सामन्याचा निकाल हा शेवटच्या चेंडूवर लागला आहे. गुरुवारी 8 एप्रिलला गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 1 धावेने विजय मिळवला. त्यानंतर आज 9 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर शेवटच्या चेंडूवर मात करत सामना जिंकला. अनकॅप्ड मुकुल चौधरी हा लखनौच्या विजयाचा हिरो ठरला. लखनौला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 30 तर शेवटच्या बॉलवर 1 रनची गरज होती. तेव्हा मुकुलने आवेश खान याच्या सोबतीने 1 धाव काढत लखनौला विजयी केलं. लखनौचा हा 19 व्या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. लखनौच्या या विजयानंतर संघमालक संजीव गोयंका यांनी स्टेडियममध्ये आनंद साजरा केला. त्यानंतर गोयंकांनी मैदानात येऊन मुकुलचं कौतुक केलं.
मुकुलची विजयी खेळी, संजीव गोयंका आंनदी