LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral
esakal April 10, 2026 04:45 AM

Sanjiv Goenka reaction after Mukul Choudhary match winning innings : लखनौ सुपर जायंट्सचा सामना अन् मालक संजीव गोएंका यांची चर्चा होणार नाही, असे कसे जमेल... संघातील प्रत्येक कामगिरीसाठी ते किती भावनिक असतात, हे इंडियन प्रीमिअर लीग मधील LSG च्या सामन्यात पाहायला मिळतेच.. दोन वर्षांपूर्वी लोकेश राहुल LSG चा कर्णधार असताना पराभवानंतर त्यांचा राग सर्वांना पाहिला होता. त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती.

जास्त मागे कशाला जायचं, LSG चा याच पर्वातील पराभवाचा सामना आठवा, तेव्हाही ते सामना संपल्यानंतर कर्णधार रिषभ पंतसोबत चर्चा करताना दिसले. तेव्हाही नेटकऱ्यांनी KL Rahul चे प्रकरण उगळुन काढताना गोएंका यांच्यावर ताशेरे ओढले.. आजही जेव्हा लखनौने रोमहर्षक विजय मिळवला, तेव्हा गोएंका मैदानावर आले आणि त्याने मॅच विनर मुकुलची भेट घेतली.. सध्या हा व्हिडीओ गाजतोय..

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

अजिंक्य रहाणे ( ४१), अंगकृश रघुवंशी ( ४५), कॅमेरून ग्रीन( ३२) व रोव्हमन पॉवेल ( ३९) यांच्या फटकेबाजीने कोलकाताने १८१ धावांपर्यंत मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लखनौला आयुष बदोनीने ( ५४) सावरले, परंतु त्याची विकेट पडली अन् कोलकाताला विजयाचे स्वप्न पडू लागले. अशा वेळी २१ वर्षीय पॉवर हिटल मुकुल मैदानावर उभा राहिला आणि त्याने २७ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांचा पाऊस पाहून शेवटच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून दिला. नाबाद ५४ धावा करणाऱ्या मुकुलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

  • KKR विरुद्धच्या सात H2H लढतींमधील LSG चा हा पाचवा विजय आहे; यामध्ये ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या चार IPL सामन्यांपैकी तीन विजयांचा समावेश आहे.

  • २०२३ मध्ये बंगळुरू येथे RCB विरुद्ध २१३ धावांचा पाठलाग करताना मिळवलेल्या १ गडी राखून विजयानंतर, धावांचा पाठलाग करताना सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर LSG चा हा दुसरा विजय आहे.

  • मुकुल चौधरीने मारलेले सात षटकार ही, IPL मध्ये ७ व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना LSG च्या एखाद्या फलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

  • धावांचा यशस्वी पाठलाग करताना, ७ व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत, मुकुलने मारलेले सात षटकार ही संयुक्त-सर्वोच्च कामगिरी ठरली आहे; यापूर्वी २०१८ मध्ये वानखेडेवर MI विरुद्ध CSK कडून खेळताना DJ Bravo ने सात षटकार मारले होते

  • धावांचा यशस्वी पाठलाग करताना, ८ व्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी मुकुल आणि आवेश यांच्यात झालेली ५४* धावांची भागीदारी ही आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

  • अशा या ऐतिहासिक विजयानंतर संजीव गोएंका यांनी मुकुलची भेट घेतली.. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.