Marathi Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्रानुसार येत्या काही दिवसांत म्हणजे 17 एप्रिल 2026 ला शनी ग्रह उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतो आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या चौथ्या आणि अंतिम चरणात शनिदेव प्रवेश करतील. शनी सध्या मीन राशीत आहे. याचा शुभ प्रभाव पाच राशींवर पडणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.
वृषभ रास :
वृषभ राशीच्या लोकांना हे संक्रमण शुभ ठरणार आहे. तुमच्या लाभ स्थानावर याचा प्रभाव पडत असल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. रखडलेली कामं मार्गी लागतील. ओळखीचे लोक आणि मित्र परिवार यांच्याकडून आर्थिक फायदा होईल. करिअरमध्ये स्थिरता येऊन आर्थिक बाजू मजबूत होईल.
मिथुन रास :
तुम्ही करिअरमध्ये मोठी झेप घ्याल. तुमच्या कष्टांचं फळ तुम्हाला मिळेल. वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. नोकरी बदलण्यासाठी हा काळ योग्य आहे. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील.
कर्क रास :
तुमचं भाग्य शनी बदलणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्य कराल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. लांबचा प्रवास कराल.
वृश्चिक रास :
वृश्चिक राशीच्या लोकांना यश मिळेल. कला, माध्यम आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात काम लोकांना विशेष धनलाभ होईल. प्रेमसंबंधात दृढता येईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळतील.
कुंभ रास :
शनीचं हे संक्रमण तुम्हाला लाभकारक ठरेल. आर्थिक बाबतीत यश मिळेल. गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. भविष्यात यातून नफा मिळेल. कुटूंबात आनंदी वातावरण असेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
'या' अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी माता करणार या 4 राशींकडे गृहप्रवेश ! संपत्ती आणि सुखाची भरभराट