Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...
esakal April 10, 2026 03:45 AM

Mukul Choudhary match winning innings vs KKR full story : आयुष बदोनीची विकेट पडली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या ६ बाद १२६ धावा झाल्या होत्या. अशा परिस्थितीत कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाच्या टक्केवारी ९५ इतकी होती, तर LSG च्या विजयाच्या ५ टक्केच अपेक्षा होत्या. पण, मुकुल चौधरी ( Mukul Choudhary) मैदानावर उभा राहिला आणि अनपेक्षित कामगिरी करून LSG ला रोमहर्षक विजय मिळवून दिला. विजयी धाव घेतल्यानंतर मुकुलूने आकाशाकडे पाहिले आणि हात जोडून देवाचे आभार मानले.

राजस्थानचा हा २१ वर्षीय फलंदाज मोठ मोठे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध होता आणि आज त्याने त्याच्या नावाची चर्चा का होतेय, हे दाखवून दिले. अजिंक्य रहाणे ( ४१), अंगकृश रघुवंशी ( ४५), कॅमेरून ग्रीन ( नाबाद ३२) व रोव्हमन पॉवेल ( नाबाद ३९) यांच्या खेळीने कोलकाताने ४ बाद १८१ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला आणि १८व्या षटकापर्यंत सामन्यात पकड घेतली. आयुष बदोनी ३४ चेंडूंत ५४ धावा करून माघारी परतला अन् लखनौच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या.

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

पण, अशा वेळी मुकुल मैदानावर उभा राहिला. शेवटच्या २४ चेंडूंत ५४ धावा हव्या असताना मुकुल आवेश खानला सोबतिला घेऊन उभा राहिला. तरीही कोलकाताने १२ चेंडूंत ३० सामना असा अवघड ठेवला होता. पण, मुकुलने १९व्या षटकात कॅमेरून ग्रीनला १६ धावा कुटल्या आणि नंतर २०व्या षटकात दोन निर्धाव चेंडू खेळूनही रोमहर्षक विजय मिळवून दिला. पाचव्या चेंडूवर षटकार खेचला अन् शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत LSGसाठी नायक ठरला...

Who Is Mukul Choudhary? The Lone Warrior Who Stunned KKR

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका छोट्या गावातून सुरू झालेला मुलुकचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मुकुलचे वडील दलीप कुमार चौधरी हे क्रिकेटचे मोठे चाहते होते. मुकुलच्या जन्माआधीच त्यांनी आपल्या मुलाने क्रिकेट खेळावे असे स्वप्न पाहिले होते. सुरुवातीच्या काळात आर्थिक अडथळे असतानाही, शिक्षक म्हणून काम करणाऱ्या दलीप यांनी आपल्या मुलाच्या प्रशिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

मुकुलने राजस्थानमधील सीकर येथील एसबीएस (SBS) क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला. त्याने सुरुवातीला यष्टीरक्षक म्हणून नव्हे, तर एक मध्यम-वेगवान गोलंदाज म्हणून खेळाला सुरुवात केली होती. एका सामन्यादरम्यान संघात यष्टीरक्षक उपलब्ध नसल्यामुळे मुकुलवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. तिथे त्यांनी आपल्या चपळाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि पुढे ते यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून नावारूपास आला.

KKR vs LSG Live: OUT or NOT OUT? अम्पायरला घाई, रिप्ले न पाहताच Finn Allen ला दिले बाद, त्या झेलवरून सुरू झालाय वाद; Video

मुकुलने राजस्थानच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले. २०२५ च्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने दिल्लीविरुद्ध मॅच-विनिंग कामगिरी केली, ज्यामुळे आयपीएल लिलावात त्यााला लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने २.६ कोटी रुपयांना विकत घेतले. १ एप्रिल २०२६ रोजी त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) आपले आयपीएल पदार्पण केले

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.