Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Marathi Updates: अजिंक्य रहाणेच्या कल्पक नेतृत्वाने अखेर कोलकाता नाइट रायडर्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पहिला विजय मिळेल असे वाटले होते. पण, मकुल चौधरीने ( Mukul Choudhary) सामनाच फिरवला... त्याने शेवटच्या दोन षटकांत मॅच लखनौ सुपर जायंट्सच्या पारड्यात आणली. KKR च्या तोंडचा घास मुकुलने पळवला आणि LSG ला गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचवले. लखनौने ३ विकेट्सने हा सामना जिंकला.. मुकुलने २७ चेंडूंत नाबाद ५४ धावा करताना २ चौकार व ७ षटकार खेचले.
KKR ने दुसऱ्याच षटकात सलामीवीर फिन अॅलनची विकेट गमावूनही सामन्यात चांगले पुनरागमन केले होते. अजिंक्य व अंगकृश यांच्या ८४ धावांच्या भागीदारीने KKR ला १० षटकांत ९८ धावांपर्यंत पोहोचवले होते. पण ११ ते १५ षटकांत अजिंक्य, अंगकृश व रिंकू सिंग बाद झाले आणि LSG ने सामन्यात डोकं वर काढले. अजिंक्य २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांवर बाद झाला, तर अंगकृशनेही ३३ चेंडूंत ४५ धावांची खेळी केली. शेवटच्या पाच षटकांत कॅमेरून ग्रीन व रोव्हमन पॉवेल यांनी १३. २ च्या रन रेटने धावा चोपल्या.
KKR vs LSG Live: OUT or NOT OUT? अम्पायरला घाई, रिप्ले न पाहताच Finn Allen ला दिले बाद, त्या झेलवरून सुरू झालाय वाद; Videoग्रीनने २४ चेंडूंत नाबाद ३२ धावा, तर पॉवेलने २४ चेंडूंत नाबाद ३९ धावा केल्या आणि संघाला ४ बाद १८१ धावांपर्यंत पोहोचवले. अजिंक्य व अंगकृश खेळपट्टीवर होते, तेव्हा कोलकाता सहज दोनशेपार जाईल असे वाटले होते, परंतु लखनौच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगला मारा केला. फिरकीपटूंनी ८ षटकांत केवळ ५९ धावा दिल्या, तेच जलदगती गोलंदाजांनी १२ षटकांत ११८ धावा दिल्या. मिचेल मार्श ( १५) व एडन मार्करम ( २२) यांनी LSG ला आक्रमक सुरूवात करून देताना ४१ धावांची सलामी दिली. पण, वैभव अरोराने त्याच्या पहिल्याच षटकात या दोन्ही सलामीवीरांना मागे पाठवले.
आयुष बदोनी आणि रिषभ पंत यांनी सावध खेळ केलेला, पंरतु कॅमेरून ग्रीनच्या त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. ग्रीन गोलंदाजी करत नसल्याने बरीच चर्चा रंगली होती आणि त्यावरून अजिंक्यनेही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे बोट दाखवले होते. पण, आज त्याने गोलंदाजी केली आणि दुसऱ्याच चेंडूवर रिषभला ( १०) माघारी पाठवले. निकोलस पूरनचे ( १३) अपयश याही सामन्यात कायम राहिले आणि कार्तिक त्यागने स्लो बाऊन्सवर LSG च्या फलंदाजाला झेलबाद केले.
अनुकूल रॉयने १३व्या षटकात अब्दुल समदचा ( २) त्रिफळा उडवला अन् लखनौचा निम्मा संघ १०४ धावांत माघारी परतला. लखनौची सर्व भीस्त आात आयुषवर होती आणि त्याने १४ व्या षटकात १५ धावा चोपून दडपण कमी केले. आता LSG ला शेवटच्या ६ षटकांत ६३ धावाच करायच्या होत्या. आयुषने षटकाराने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढच्या चेंडूवर अनुकूलने ऑफसाईडला आयुषला फटका खेळण्यास भाग पाडून झेलबाद केले. आयुष ३४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला.
मुकुल चौधरी हा लखनौचा शेवटचा फलंदाज मैदानावर होता आणि त्याच्याकडूनच आता विजय खेचून आणण्याच्या आशा होत्या. सुनील नरीनने ( ४-०-१३-१) अप्रतिम गोलंदाजी करून मोहम्मद शमीला झेलबाद केले. मुकुलने दमदार फटकेबाजी करताना १२ चेंडंत ३० धावा असा सामना जवळ आणला. ग्रीनच्या १९व्या षटकात मुकुलने १६ धावा कुटल्या आणि ६ चेंडू १४ धावा असा सामना LSG च्या पारड्यात झुकला. आवेश खानने एक धाव घेत मुकुलला स्ट्राईक दिली. मुकुलने षटकार खेचून ४ चेंडूंत ७ असा सामना जवळ आणला. त्यानंतर वैभवने राऊंड दी स्टम्प गोलंदाजी करताना दोन चेंडू निर्धाव टाकले. पण, पाचवा चेंडू ऑफ साईडला षकार खेचला आणि मुकुलने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मुकुलने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत मॅच जिंकली.