बारामतीत राजकीय घडामोडींना वेग
पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार
काँग्रेसच्या भूमिकेची राज्यभरात चर्चा
बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामतीत पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांना कॉल केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी काँग्रेसला सहकार्य करण्याची विनंती केली.
"बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी तटकरे-पटेलांचे प्रयत्न नाहीत", पडद्यामागे नेमकं कोणतं राजकारण शिजलंसुनेत्रा पवार यांनी स्वत: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भेट घेतली. तर रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन पार्थ पवार यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांच्या कार्याचा उल्लेख करत अर्ज माघार घेण्याची भूमिका घेतली.
बारामतीच्या मैदानात न उतरता देखील काँग्रेसला फायदा झाला आहे. पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केली होती. परंतु टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाच नरमाईची भूमिका घेतली. सुप्रिया सुळे देखील म्हणाल्या की, 'पवार कुटुंब आणि काँग्रेसचे नाते जुनं आहे. फक्त विचारधारेपर्यंत मर्यादित नाही'.
Baramati : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा, काँग्रेसनं बारामतीमधून अधिकृत उमेदवारी मागे घेतलीदुसरीकडे जय पवार यांनी देखील काँग्रेसचे आभार मानले. जय पवार म्हणाले, 'अजित पवारांनी नेहमी विकासाच्या मुद्यावर राजकारण केलं आहे. बिनविरोध निवडणूक होणे हीच त्यांनी खरी श्रद्धांजली ठरेल' . बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत २३ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याचेही स्पष्ट झालं आहे.