Nitesh Rane: राज्याला मत्स्यव्यवसायात अव्वल स्थान मिळवून देणार, मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
esakal April 10, 2026 03:45 PM

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

वर्सोवा येथील केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थेत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, एमएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mumbai HC: शिक्षकांना वेतन नाही तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करा... गाड्या विका, पण पैसे द्या; कोर्टाने सरकारला तीव्र शब्दांत झापले

नितेश राणेम्हणाले, की मत्स्यव्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून मत्स्यव्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.

जिल्हास्तरावर शिबिरे आयोजित करून जनजागृती करावी तसेच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विभागातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकणवासीयांचा प्रवास गारेगार होणार, कोकणात विशेष एसी गाडी धावणार, कुठे आणि कधी? वाचा सविस्तर उत्पादनवाढीस चालना

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पर्धाही आयोजित करणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामास्वामी यांनी राज्य व जिल्हा नियोजनांतर्गत २८ योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. समूह पद्धतीने योजना राबवल्यास उत्पादनवाढीस चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.