धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदी संधी दिली तर… करुणा मुंडेंचा तो शाप महायुतील सरकारला भोवणार?
Tv9 Marathi April 10, 2026 05:45 PM

Karuna Munde on Dhananjay Munde: करुणा मुंडे यांनी बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवारी कायम ठेवली. काँग्रेसने काल राजकीय संस्कृतीचा आणि राष्ट्रवादीच्या विनंतीचा दाखला देत उमेदवारी माघारी घेतली. पण करुणा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना उमेदवारी का मागे घेतली नाही याविषयी मोठी भूमिका जाहीर केली. त्याचवेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे. करुणा मुंडे यांच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

काँग्रेसने पण डमी फॉर्म टाकला

बारामती पोट निवडणुकीबाबत करुणा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्या व्यक्तीच्या जागी आणि ज्याच्यासाठी ही निवडणूक घेतली जात आहे, त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि एफआयआर नोंदवण्यासाठी मी ही निवडणूक लढवेन.उपमुख्यमंत्री असूनही सुनेत्रा पवार यांनी एफआयआर दाखल केला नाही. ज्यांची बारामती आहे आणि ज्यांची पोट निवडणूक आहे. अजितदादांच्या विमान अपघाताविषयी गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांना जर या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय भेटू शकत नाही, तर मग सर्वसामान्यांचं काय? इतके दिवस झाले पण हा घात पाहत होता की एक्सीडेंट होता हा मुद्दा कोणी उचलला नाही. आणि FIR करण्यासाठी त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये दाखल होत नाही.
अजित दादांसाठी मी बारामतीमध्ये लढण्याच्या प्रयत्न करत आहेत. मला माहित होतं काँग्रेसच्या उमेदवाराने पण डमी फॉर्म टाकला गेलेला आहे. मला पण खूप काही ऑफर होती तरी पण मी माघार घेतली नाही, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांकडे जर आपण काम घेऊन गेलो तर ते दुसऱ्या दरवाजातून बाहेर निघून जातात. जनता आणि जर मला संधी दिली तर शंभर टक्के मी संधीचे सोनं करू. लोकशाही जिवंत ठेवायचे आहे हा सर्व पेक्षा जास्त मोठा मुद्दा आहे. अजित दादांना न्याय भेटू शकत नाही तर कोणाला न्याय भेटणार? उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेक बड्या नेत्यांचे फोन आले. पार्थ पवार यांचाही फोन आला होता. जिंकल्यानंतर सर्वात आधी मी अजितदादा पवार यांच्या रखडलेला FIR नोंदवण्यासाठी लढा देईन असे करुणा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांना मंत्री केल्यास सरकार जाणार

धनंजय मुंडे यांना मंत्री केल्यास, तशी चूक केल्यास ज्या पक्षानं त्यांना मंत्री केले, त्यांची सत्ता राज्यातून जाणार. ते सरकार पुन्हा कधी राज्यात परत येणार नाही. हा एका स्त्रीचा शब्द आहे असा शापही त्यांनी दिला. धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या बायकोला तुरूंगात टाकले. अनेक लोकांना जेलमध्ये टाकले. माझ्याकडे 1000 जणांची यादीच आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरूंगात डांबले. बंजारा समाजाने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना नाकारले आहे. त्यांना जर मंत्रीपद दिले तर मी मंत्रालयासमोर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला.

ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया

बीजेपी आणि ट्रिपल इंजन सरकार सिर्फ धुवा निकालने वाला इंजन है. ट्रिपल इंजिनचे सरकार लोकांना ED सीडी आणि कुठेतरी अडकवण्याच्या प्रयत्न करून दबाव टाकून आपला पक्ष मध्ये घेण्याच्या प्रयत्न करत आहे. ऑपरेशन टायगरला आपण ऑपरेशन टायगर म्हणू शकत नाही, आपण याला ऑपरेशन मेंढी म्हणू शकतात, असा चिमटा मुंडे यांनी काढला.

रवींद्र वायकर यांच्या घरी ईडी पाठवली होती. रात्री दोन वाजल्यापासून ईडीचे लोक त्यांना त्रास देत होते. त्यांच्या जवळची व्यक्ती त्यांनी मला सांगितलं होतं. रवींद्र वायकर यांनी सांगितलं होतं की मला घेऊन चला पण मी शिवसेना सोडणार नाही. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. रवींद्र वायकर यांच्या बायकोला पण ईडीचे लोक घेऊन जाणार होते. तर आता खरात जेलमध्ये आहे त्यांच्यावर बोलणं काही उपयोग नाही. पण माझी एकच मागणी आहे त्यांची जी टोळी आहे त्यांना कोण संरक्षण देत आहे, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.