Narayan Rane : आयुष्यात बाळासाहेब ठाकरे यांचं फार मोठ स्थान आहे. मी आणि हनुमंत दोघेही कायम त्यांच्या सभेला जाऊन त्यांना हार घालायचो. बाळासाहेबांनी मला घरी बोलवून मला पद दिल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. आयुष्यात अनेक भाषण केली पण आजचा दिवस माझ्यासाठी वेगळा असल्याचे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. माझ्या नेत्यांनी, सहकार्यानी भाषणं केली, त्यांना आज उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे मी निरुत्तर झालो, माझी जिरली असच म्हणेन असेही राणे म्हणाले. आज माझा असा सत्कार झाला. नितेश राणेंनी मला विचारलं की कोणा कोणाला बोलावू, मी म्हटलं नितीन गडकरी यांना बोलवं पण बाकी कोणालाही बोलवं असे नारायण राणे म्हणाले.
आज नारायण राणे यांनी 75 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल सिंधुदुर्गमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी राणे बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार, प्रविण दरेकर, प्रसाद लाडमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे उपस्थित होते. मला आज माझा निरोप सभारंभ असल्यासारखं वाटतं होतं. मात्र तुमची अपेक्षा असेल तर राजकारणात राहीन असे राणे म्हणाले. उभं राहण्या अगोदर पत्नी विचारते काय बोलणार मी म्हटलं माहिती नाही.
अमृतवर्षात पदार्पण करत आहे, माझ्या दोन्ही चिरंजीवांनी आणि कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझे कौतुक केल्याचे राणे म्हणाले. आज भाजपमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी विमानतळावर होतो, त्यावेळी ते भाजपमध्ये या असे म्हणाले होते. मी पदाचा मान ठेवणारा माणूस आहे असे राणे म्हणाले. आजही कुठलीही अडचण आली की मी पुढे असतो असे राणे म्हणाले.
मी राजकारणात काय मिळवलं ते तुम्ही ऐकले. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी जे माझं कौतुक केलं ती माझी संपत्ती आहे असे नारायण राणे म्हणाले. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील असून मला गर्व वाटतो. त्यांचा इतिहास आत्मसात करणे गरजेचे आहे. मला आज माझा निरोप सभारभ असल्याचे वाटतं होते. मात्र मी त्यांची अपेक्षा असेल तर राजकारणात राहीन, असेही राणे म्हणाले. राजकारणात यशाची जमापुंजी पाहण्यापेक्षा काम करत राहीन. आजच्या सभेत निलेश आणि नितेश यांना खूप काही शिकायला मिळालं ते आत्मसात करतील असे राणे म्हणाले.