स्वयंघोषित कॅप्टन, भोंदू अशोक खरात प्रकरणाचे धागेदोर प्रचंड गुंतागुंतीचे असून त्याच्या अनेक कारनाम्यानी नागरिकच काय पोलिसही चांगलेच हादरले आहेत. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, अत्याचार, फसवाफसवी, पैसे लुबाडणे अशी अनेक काळी कृत्य त्याने केली असून त्याच्याविरोधत 15 गुन्हे दाखल झाले आहेत. तुरूंगाच्या गजाआड असलेल्या खरातीच एसआयटीकडून रोजच्य रोज चौकशी होत असते आणि त्यात नवनवी धक्कादायक माहितीदेखील उघड होते. दरम्यान याच भोंदू खरात प्रकरणाता आता एक नवा ट्विस्ट आला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका?
राज्याच्या उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील एका व्यक्तीकडून SITकडे ही तक्रार करण्यात आली आहे. ही – तक्रार भोंदू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. SIT कडून या तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता आहे. कोणीतरी खोडसाळपणे ही तक्रार केल्याचां संशय असून सत्य काय ते शोधून काढण्यासाठी या तक्रारीत खरंच किती तथ्य आहे याची SIT कडून पडताळणाी करण्यात येणार आहे.
चाकणकर आल्या होत्या अडचणीत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तसेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांचे नाव अशोक खरात प्रकरणात पुढे आले होते. तो त्यांचा गुरु होतचा, खरातसोबतचे चाकणकरांचे अनेक फोटोही समोर आले होते. एवढंच नव्हे तर – अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या अशी माहिती देखील उघड झाली होती. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात त्या अशोक खरातची पाद्यपूजा करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतरही त्यांच्यावर टीका सुरूच असल्यामुळे अखेर त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता.
खरात प्रकरणी ED कडून कारवाई
दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणी ED कडून कारवाई करण्यात आली आहे. भोंदू अशोक खरातची तीन खाती ईडी कडून सील करण्यात आली आहेत. तसेच अशोक खरातची फरार असलेली पत्नी, कल्पना खरात हिचे एक बँक खाते देखील ईडीने सील केलं आहे. या बँक खात्यांमधील गेल्या तीन वर्षापासूनच्या व्यवहारांची ईडी कडून पडताळणी करण्यात आली. SIT सोबतच ED कडून देखील भोंदू खरातभोवतीचा फास आवळला जाणार आहे.