Pickle Storage Tips : लोणचं वर्षभर होणार नाही खराब, वापरा या सिक्रेट ट्रिक्स
Marathi April 11, 2026 03:25 PM




उन्हाळ्यात वर्षभराकरिता गृहिणी पापड, कुरडया आणि लोणचं बनवतात. हे पदार्थ एखादे दिवशी भाजी नसेल तरी ताटात तोंडी लावायला पुरेसे असतात. त्यामुळे रोजच्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी हे पदार्थ ताटात आवर्जून घेतले जातात. या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे लोणचं. आंब्यापासून ते भाज्यांपर्यंत विविध पदार्थांचं लोणचं बनवलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसात तर आंब्याचा सिझन असल्याने वर्षभर पूरेल इतकं लोणचं बनवलं जातं. परंतू काहीवेळा हे लोणचं योग्य पद्धतीने स्टोअर न केल्याने लगेच खराब होतं. यासाठी आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत, जेणेकरून वर्षभर लोणचं फ्रेश राहील.

  • सर्वप्रथम जी फळे आपण वापरणार आहोत ती फळे ताजी घ्यावीत.
  • लोणच्यासाठी लागणारे फळे स्वच्छ धुवावीत.
  • लोणचं बनवताना बरणीत पाण्याचा लवलेशही नसावा. बरणी धुतल्यावर  कडक उन्हात किंवा फॅनखाली पूर्णपणे वाळवावी.
  • लोणचं साठवण्यासाठी फक्त काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरावी. प्लास्टिकमध्ये लोणचे लवकर खराब होते.
  • लोणच्यावर किमान 2 इंच तरी तेलाचा थर असावा. यामुळे बुरशी लागत नाही.
  • मीठ हे प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् असल्याने लोणच्यामध्ये अधिक प्रमाणात मीठ घालावे.
  • लोणच्याच्या फोडी तयार करताना स्टीलच्या सुरीचा वापर करावा.
  • लोणचं थंड झाल्यानंतर बरणीत भरा. यामुळे लोणचे खराब होणार नाही.
  • लोणच्यासाठी स्वच्छ, कोरडा आणि लाकडी किंवा स्टीलचा चमचा वापरावा.
  • दररोज लागणारे लोणचं एका छोट्या काचेच्या बरणीत काढून घ्यावे. त्यामुळे साठवण करुन ठेवलेल्या बरणीत दररोज चमचा घालावा लागणार नाही आणि लोणचं खराब होणार नाही.
  • बरणी दमट आणि अंधाराच्या ठिकाणी ठेवू नये.
  • लोणच्याला बुरशी लागल्याचे वाटत असेल तर वरचा थर काढून टाकावा आणि लोणचे उन्हात ठेवून त्यात थोडे गरम तेल घालावं.

हेही वाचा – Expiry Date VS Best Before मधला छोटा फरक ठरू शकतो जीवघेणा, समजून घ्या खरा अर्थ



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.