Entertainment News : सध्या नॅशनल क्रश असलेली अभिनेत्री गिरीजा ओक खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ, फोटो खूप व्हायरल झाले आहेत. महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी गिरिजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गिरिजाने तिच्या आणि नितीन गडकरी यांच्या खास ओळखीविषयी सांगितलं.
गिरिजाने नुकतीच कॅच अप चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने राजकीय ओळखींवर भाष्य केलं. काय म्हणाली ती जाणून घेऊया.
"मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध कार्यक्रमांमध्ये भेटले आहे. त्यांची मी फक्त मुलाखत घेतली होती. पण विशेष ओळख सांगायची झाली तर नितीन गडकरीजी यांच्याशी माझी ओळख आहे. कारण माझी आई आणि नितीनजी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. शाळेत असतानाची त्यांची ओळख आहे."
"गेल्यावर्षी मला नितीनजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला तेव्हा ते कार्यक्रमाला आले होते. मी जेव्हा रंगमंचावर पुरस्कार घ्यायला गेले तेव्हा त्यांनी मला पुरस्कार देतानाच विचारलं की आई कुठेय ? मी त्यावेळी रंगमंचावरूनच त्यांना दाखवलं होतं आई तिथे बसलीये. मग आईला मी खुणावलं होतं की हात वरून दाखव."
"कार्यक्रम झाल्यावर आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या आजूबाजूला खूप गर्दी होती. तेव्हा जेव्हा त्यांनी माझ्या आईला आणि मला पाहिलं तेव्हा ते सगळ्यांना अतिशय नम्रपणे म्हणाले जरा मला पाच मिनिटं द्या. माझी बालमैत्रीण आलीये. मग ते बाजूला येऊन आमच्याशी बोलले. त्यांची आणि आमची ओळख फार जुनी आहे. नितीनजी जेव्हा कधीही भेटतात तेव्हा आपुलकीने सगळ्यांची विचारपूस करतात. त्यांच्या अनेक नातेवाइकांशीही आमची ओळख आहे. आम्ही नागपूरचे असल्याने बऱ्याच जणांना ओळखतो."
"आम्ही 24 तास काम करतो..." ठरलं तर फेम जुईने उघड केली मालिकेच्या शूटिंगची कसरत "आजारी असतानाही.."