HIV Report: एचआयव्हीच्या चुकीच्या अहवालाने संसार उद्ध्वस्त; महिलेवर दीड वर्षे औषधोपचार, साेलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार!
esakal April 11, 2026 06:45 PM

सोलापूर : अकलूज येथील आयसीटीसी केंद्राने गर्भवती महिलेचा एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा अहवाल दिल्यामुळे तिच्यावर दीड वर्षे औषधोपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या चुकीच्या अहवालामुळे संबंधित महिलेचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असून, तिने मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!

पीडित महिलेने आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. गर्भवती असल्याने तिची अकलूज उपजिल्हा रुग्णालयातील दिशा समुपदेशन केंद्रात एचआयव्ही चाचणी करण्यात केली होती. त्यावेळी संबंधित केंद्राने चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर सुमारे दीड वर्षे तिला एचआयव्हीवरील उपचार देण्यात आले.

या चुकीच्या अहवालामुळे महिलेवर संशय घेत सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले. त्यानंतर इंदापूर, बारामती आणि पंढरपूर येथे करण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले. या संपूर्ण प्रकारामुळे तिचा संसार उद्ध्वस्त झाल्याचे पीडितेने सांगितले. ‘माझा संसार पुन्हा जोडून द्यावा व संबंधितांवर कारवाई करावी,’ अशी मागणी तिने केली.

Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?


दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी या प्रकरणी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती एका आठवड्यात अहवाल सादर करणार असून, त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी पीडित महिलेसमवेत छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. योगेश पवार उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.