संत विठाबाई
Marathi April 12, 2026 06:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संत विठाबाई 18व्या शतकाच्या शेवटच्या काळात जन्माला आलेल्या एक स्त्रीसंत. त्यांच्या वडिलांना पंढरीच्या विठ्ठलाचा स्वप्नात दृष्टांत झाला, आणि त्यांच्या पोटी मुलगी जन्माला आली, म्हणूनच मुलीचे नाव विठा ठेवले. संत विठाबाईंनी सुमारे चार हजार अभंग रचल्याचा संदर्भ सापडतो. संत नागरी किंवा संत बहेणा यांनी ज्याप्रमाणे अभंगातून स्वत:ची चरित्र कहाणी सांगितली तशी संत विठाबाई यांनी आपली कहाणी अभंगातून सांगितली.  त्यांनी ‘राजाराम’ या गुरुंचे शिष्यत्व स्वीकारले होते. पूर्वी ते संत तुकाराम होते, अशी त्यांची श्रद्धा होती. विठाबाईंचे आज सहाशे अभंग उपलब्ध आहेत असे सांगितले जाते. अभंगाचे विषय गुरुमहात्म्य, नाम महिमा, संत महिमा असे असून व त्यांनी स्वत विषयीची अभंगरचनाही केल्या आहेत. संत विठाबाईंना वारकरी संतपरंपरेची चांगली ओळख होती. पारमार्थिक ग्रंथाचे त्यांचे वाचन व संत मीरेच्या चरित्राचा त्यांचा परिचय होता. त्यांच्या भक्तीपर अभंगातून फार स्पष्टपणा जाणवतो. त्यांच्या अभंगात संत तुकारामांच्या विचाराचा आवेश आढळतो अन् भक्तिभावनेची स्पष्टताही जाणवते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.