घाटनांदूर: एकीकडे जग डिजिटल होत असताना ग्रामीण भागात आजही सरकारी पत्र हा विश्वासाचा मोठा आधार मानला जातो. मात्र, घाटनांदूर परिसरातील टपाल विभागाच्या गलथान कारभारामुळे हा विश्वास आता धुळीला मिळत आहे. घाटनांदूरसह उजनी, पट्टीवडगाव, साळुंकवाडी, पुस आणि गिरवली या ब्रांच अंतर्गत येणाऱ्या हजारो नागरिकांना सध्या टपाल सेवेच्या अनागोंदीचा सामना करावा लागत आहे.
कल्पना करा, एखाद्या तरुणाने वर्षभर स्पर्धा परीक्षेची तयारी केली, पण त्याचे प्रवेशपत्रच वेळेवर पोहोचले नाही तर? किंवा एखाद्या वृद्धाची बँकेची कागदपत्रे वेळेवर न मिळाल्याने त्यांचे पेन्शन रखडले तर? हे केवळ कल्पनेतले दुःख नसून घाटनांदूरकरांच्या वाट्याला आलेले वास्तव आहे. येथील पोस्टमन गावोगावी जाण्याचे कष्ट घेण्याऐवजी चक्क घाटनांदूरमधील पतसंस्था किंवा जनरल स्टोअरमध्ये बसून टपाल वाटप करत आहेत. तुमचे पत्र अमुक दुकानात ठेवले आहे, तिथून घेऊन जा, असे फर्मान सोडले जाते. यामुळे कित्येक महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होत आहेत, तर काही वेळा चुकीच्या हातात पडत आहेत.
Beed News: ‘सीतेच्या न्हाणी’चे वैभव पडले अडगळीत; विकासाचा वनवास; किल्ले धारूरच्या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था वाढली फलकही गायब; साळुंकवाडी कार्यालयाची दुरवस्थाटपाल विभागाच्या बेजबाबदारपणाची हद्द म्हणजे साळुंकवाडी येथील पोस्ट ऑफिसला साध्या नावाचा फलकही नाही. कार्यालय कुठे आहे आणि सेवा काय आहेत, याचा थांगपत्ता लागत नाही. जर लवकरात लवकर सेवेत सुधारणा झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा या भागातील संतप्त नागरिकांनी दिला आहे.
अधिकाऱ्यांची टोलवाटोलवीपोस्ट ऑफिसमध्ये कर्मचारी अपुरे असल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी नागरिकांच्या मते हे केवळ नियोजनाचे अपयश आहे. तक्रार पुस्तिका मागूनही दिली जात नसल्याचे गंभीर आरोप होत आहेत. याबाबत पोस्ट इन्स्पेक्टर पी. ए. महाजन (अंबाजोगाई) यांनी ‘मला एकच काम नाही, लेखी तक्रार आल्यास कारवाई करू’ अशी भूमिका घेतल्याने नागरिकांमधील संताप अधिकच अनावर झाला आहे.
Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू रजिस्टर टपालाचा खेळकाही पोस्टमन रजिस्टर टपाल वाटप झाल्याचे खोटेच दर्शवून ती पत्रे स्वतःजवळ ठेवत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. नियमानुसार पोस्ट ऑफिसमध्ये तक्रार पुस्तिका दर्शनी भागात असणे बंधनकारक आहे. मात्र, घाटनांदूरमध्ये वारंवार मागणी करूनही ही पुस्तिका ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात नाही, हे विशेष.